Cape Dainik Gomantak
गोवा

Cape News : धडे सावर्डेत नागनाथ देवस्थान परिसर सौंदर्यीकरणास प्रारंभ

Cape News : मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या सहकार्यामुळे हे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, सावर्डे मतदारसंघात लोकांना विश्वासात घेऊनच विकासकामे केली जाणार आहेत.

आतापर्यंत अनेक विकासकामांना सुरुवात झाली आहे असे सावर्डेचे आमदार तथा गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी सांगितले. सावर्डे पंचायत क्षेत्रातील धडे येथील श्री नागनाथ वेताळ देवस्थानाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पंचायत सद्स सुवर्णा तेंडुलकर, सरपंच चिन्मयी नाईक, पंच सद्स शशिकांत नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री वेताळ देवस्थानाच्या सुशोभीकरण कामासाठी तब्बल साडेचार कोटी खर्च करण्यात येणार असून यात देवस्थानात येणाऱ्या भविकासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यात मुख्य म्हणजे प्रसाधन गृह,हात पाय धुण्यासाठी वेगळी व्यवस्था तसेच मंदिरासमोर भव्य प्रवेशद्वाराचा समावेश असल्याचे गावकर यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यात सरकारी खर्चाद्वारे अशी सुविधा असलेले हे पहिलेच देवस्थान असणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या सहकार्यामुळे हे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार गणेश गावकर यांनी या दोन वर्षात सावर्डे पंचायत क्षेत्रात अनेक विकासकामे केली असून यात आपल्या प्रभागात सुद्धा भरीव कामे पूर्ण झाली असल्याचे पंच सदस्य शशिकांत नाईक यांनी सांगितले.

आज देवस्थानाच्या सुशोभीकरण कामाबरोबर एक किमी जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागात ‘हर घर नल से जल’ या योजनेचा लाभ होणार असल्याचे नाईकयांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT