mla Ganesh Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Cape News : गणेशभाऊंना मंत्रिपद द्या; वाढती मागणी

Cape News : रोजगारप्रश्‍न सुटेल; मंत्री नसतानाही भाजपला सावर्डेत आघाडी

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना गोवा सरकारात मंत्रिमंडळात सामील करून घ्‍यावे यासाठी स्‍थानिक पंच सदस्‍यांकडून मागणी वाढत आहे.

या मतदारसंघातील सातही पंचायतींच्‍या सरपंंचांनी हल्‍लीच मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गावकर यांची वर्णी मंत्रिपदी लावावी, अशी मागणी केली हाेती. या मागणीने आता पुन्‍हा एकदा जोर धरला आहे.

मतदारसंघातील युवकांना सरकारी नाेकऱ्या अजून आवश्‍‍यक त्‍या प्रमाणात मिळत नाहीत. या मतदारसंघात खासगी आस्‍थापनात रोजगार संधीही नगण्‍य आहेत. त्‍यामुळे ‍या युवकांना राेजगार प्राप्‍त व्‍हावा यासाठीच गावकर हे मंत्रिपदी आले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया काही पंचसदस्‍यांनी व्‍यक्‍त केली.

विधानसभा निवडणुकीत गावकर यांना मगोचे दीपक पाऊसकर यांच्‍यापुढे पराभव स्‍वीकारावा लागला. कालांतराने भाजप पक्षाने आपली गरज म्‍हणून पाऊसकर यांना भाजप पक्षात समाविष्‍ट करुन घेतले त्‍यावेळी गावकर यांनी कुठलाही गहजब न करता भाजपचा हा निर्णय मानून घेतला. मागच्‍या विधानसभा निवडणुकीत गावकर यांना भाजपने उमेदवारी दिल्‍यावर ते पुन्‍हा एकदा निवडून आले.

वास्‍तविक त्‍यांचा अनुभव आणि ज्‍येष्‍ठत्‍व पाहिल्‍यास त्‍यांना मंत्रीपद मिळणे अावश्‍‍यक होते. पण भाजप पक्षापुढे त्‍यावेळी जी परिस्‍थिती होती त्‍यात गावकर यांना मंत्रीपद मिळू शकले नाही, पण गावकर यांनी तसला कुठलाही प्रकार न करता पुन्‍हा एकदा पक्षाचा आदेश शिरोधार्थ मानला. त्‍यामुळेच त्‍यांची पक्षावरील निष्‍ठा स्‍पष्‍ट होते असे मत या पंचसदस्‍यांनी मांडले आहे.

गावकरांनी भाजपचा गड राखला

गावकर यांनी भाजप पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही. ज्‍यावेळी सावर्डे मतदारसंघात खनिज उद्योजक साळगावकर यांचा दबदबा होता आणि त्‍या दबदब्‍यांसमोर कुणीही भाजपची उमेदवारी घेण्‍यास पुढे येत नव्‍हते. त्‍यावेळी गावकर यांनी धीर दाखवून भाजपची उमेदवारी घेतली.

आणि माजी आमदार अनिल साळगावकर यांचे पुत्र अर्जुन साळगावकर यांचा पराभव केला. यावेळी सावर्डेतील सर्व पंचसदस्‍य साळगावकर यांना पाठिंबा देत होते. असे असतानाही गावकर यांनी त्‍यांना कडवी लढत देत भाजपच्‍या हातातून निसटलेला सावर्डे मतदारसंघ पुन्‍हा भाजपला मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT