Cape Constituency Dainik Gomantak
गोवा

Cape Constituency : वजन कुणाचे अधिक? बाबू की एल्‍टन; केपे मतदारसंघात चर्चा

Cape Constituency : केपे मतदारसंघात भाजपचे दोन गट कार्यरत असून दोन्ही गटांनी भाजपाला चांगले मतदान झाले असल्याचे सांगितले तर एल्टन डिकॉस्टा यांनीही मतदारसंघात बरेच काम केले असल्याने काँग्रेस पक्षाला आघाडी मिळणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Cape Constituency :

केपे, लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, याचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते व्यस्त असून आपल्याच पक्षाचा विजय होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते करू दक्षिण गोव्यातील केपे मतदारसंघाकडे बऱ्याच लोकांचे लक्ष असून या मतदारसंघात ७८% मतदान झाले असल्याने बाबू कवळेकर की एल्टन डिकॉस्टा बाजी मारणार? याचीही उत्सुकता लोकांना लागली आहे.

केपे मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा आमदार असल्याने या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला आघाडी मिळणार असल्याचे बोलले जात होते, पण विधानसभा निवडणुकीत लोकांचा मुद्दा वेगळा होता, पण यावेळी लोक मोदींसाठी मतदान करणार असल्याचे भाजपा कार्यकर्ते सांगत आहेत.

केपे मतदारसंघात भाजपचे दोन गट कार्यरत असून दोन्ही गटांनी भाजपाला चांगले मतदान झाले असल्याचे सांगितले तर एल्टन डिकॉस्टा यांनीही मतदारसंघात बरेच काम केले असल्याने काँग्रेस पक्षाला आघाडी मिळणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगतात.

मोदींसाठी मतदान!

भाजपाला किमान पाच हजार मतांची आघाडी मिळणार असल्याचे नगरसेवक दयेश नाईक यांनी सांगितले. पालिका क्षेत्रात आपल्या प्रभागात भाजपाला आघाडी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत जी आघाडी काँग्रेस पक्षाला मिळाली होती, ती यावेळी त्यांना मिळणार नसून लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पाहून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकांनी मतदान केले आहे, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT