Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : भारताला जागतिक ताकद बनविण्यासाठी क्षमतावान व राष्ट्र समर्पित नेत्यांची गरज : प्रा.वल्लभ केळकर

‘ज्ञानप्रकाश’मध्ये विद्यार्थी मंडळाचे शपथग्रहण

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : क्षमतावान व राष्ट्र समर्पित नेत्यांची आमच्या देशाला गरज असून त्यांच्या जोरावरच आपला देश एक जागतिक ताकद म्हणून नावारूपास येईल, असे प्रतिपादन प्रा. वल्लभ केळकर यांनी मुळगाव येथील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ पदग्रहण सोहळ्यात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना केले.

विद्यार्थी जीवनात नेतृत्व केलेल्या अनेक तरुणांनी राष्ट्रीय विषयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्या समाजात अनेक दिखाऊ नेते पाहायला मिळतात. जे राष्ट्र हितापेक्षा स्वहिताला जास्त महत्त्व देतात. शपथ घेतलेल्या तरुणांनी अशा नेत्यांचा आदर्श न घेता राष्ट्र आणि समाजाला वाहून घेतलेल्या लोकांचा आदर्श घ्यावा.

नेते हे फक्त राजकारणातच नसतात तर सामाजिक जीवनात सुद्धा हजारो लोक लोकांचे नेतृत्व करतात. विवेकानंद, जेआरडी टाटा, एमएस विश्वेश्वरय्या, नारायण मूर्ती या सारख्या दिग्गजांनी आपल्या प्रामाणिक आणि राष्ट्र समर्पित जीवनाने आदर्श निर्माण केले, असे प्रा. केळकर पुढे बोलताना म्हणाले.

युवक विधायक मार्गावर असतील, तर राष्ट्राचा उत्कर्ष नक्कीच होतो. त्यामुळे सत्ता ही मिळालेली संधी समजून युवकांनी काम केल्यास त्याची कधीच झिंग चढणार नाही आणि त्याचा नक्कीच विधायक उपयोग होईल. असेही प्रा. केळकर म्हणाले.

व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष प्रिया राऊत, विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत परब, विद्यार्थी मंडळाचे प्रभारी प्रा. शिवानंद हिरोजी आणि सहप्रभारी प्रा. दयांनंद कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.वल्लभ केळकर यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना शपथ दिली. प्रिया राऊत यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक प्राचार्य लक्ष्मीकांत परब यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रणिता गावकर, यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्रा.शिवानंद हिरोजी यांनी केला. प्रा.दयानंद कुंभार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

विद्यार्थी मंडळ

निवडण्यात आलेले विद्यार्थी मंडळ पुढीलप्रमाणे ः निहिरा नाईक (सरचिटणीस), स्वराली वझे (सहायक सरचिटणीस, सर्वांगी अस्नोडकर (सांस्कृतिक सचिव), वेलन्सिया फर्नांडिस (सहायक सांस्कृतिक सचिव),सिद्देश गवस (क्रीडा सचिव), दक्ष फळदेसाई (सहायक क्रीडा सचिव), साहिल हळर्णकर, प्रजोल उस्कैकर, दीप गवस, हरीश देसाई, चेतन तळवणेकर आणि सुहान रेवणकर (सर्व वर्ग प्रतिनिधी) कशीष नार्वेकर, जिया परवार, प्राची गडेकर,रितिका सावंत,पूर्णिमा कुडास्कर आणि श्रेया परब (सर्व विद्यार्थिनी प्रतिनिधी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT