Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Sextortion Case: 'चॅट करो'वरुन डेटिंग पडले महागात; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, गोव्यातील एकाला 1.35 कोटींचा गंडा

Goa Sextortion Case: बॉस्को फर्नांडीस 'चॅट करो' या डेटिंग अॅपच्या माध्यामातून अंगडी मुकेरी येथील झीटा फर्नांडीस हिच्या संपर्कात आले.

Pramod Yadav

Goa Sextortion Case

'चॅट करो'वरुन डेटिंग करणे गोव्यातील एका व्यक्तीला महागात पडल्याचे समोर आले आहे. डेटिंगच्या माध्यमातून दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कर्नाटकातील टोळीने 1.35 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोसी -कासावली येथील डेलानो बॉस्को फर्नांडीस (40) असे या सर्व प्रकारला बळी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते व्यवसायाने दर्यावर्दी आहेत. बॉस्को फर्नांडीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२० - २२ या काळात हा प्रकार घडला.

बॉस्को फर्नांडीस 'चॅट करो' या डेटिंग अॅपच्या माध्यामातून अंगडी मुकेरी येथील झीटा फर्नांडीस हिच्या संपर्कात आले.

दोघांचा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क येत होता. दरम्यान, दोघांचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत बॉस्को फर्नांडीस यांच्याकडून 1.35 कोटी रुपये उकळण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी आणखी दोघा संशयितांची नावे समोर आली आहेत. मेरी फर्नांडीस आणि शंकर जाधव अशी त्यांची नावे असून, दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून याप्रकरणी फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरण सायबर विभागाकडे वर्ग केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT