Ganja plant Panjim Dainik Gomantak
गोवा

Panjim News: पणजी 'गांजा'च्या विळख्यात, पाचव्यांदा रोप आढळल्याने खळबळ; राजधानीत या बिया पेरतंय तरी कोण?

Panjim Ganja Plant News: करंझाळेमधील टोंक येथील ग्रीन एकर्स हॉलजवळ एक संशयास्पद रोप आढळून आले आहे

Akshata Chhatre

पणजी: स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या राजधानी पणजी शहरात पुन्हा एकदा फुटपाथवर गांजाचे रोप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. करंझाळेमधील टोंक येथील ग्रीन एकर्स हॉलजवळ एक संशयास्पद रोप आढळून आले आहे. याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत हे गांजाचे रोप असल्याची खात्री केली आणि ते ताब्यात घेतले.

शहरातील ५ वी घटना प्रश्नचिन्ह उपस्थित

पणजी शहरात अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच काकुलो मॉल परिसरात अशाच प्रकारचे गांजाचे रोप सापडले होते. त्यावेळी अमलीपदार्थ विरोधी पथकाने सखोल तपास करून ते रोप गांजाचेच असल्याची खात्री केली होती. आता पुन्हा एकदा शहराच्या मध्यभागी, वर्दळीच्या ठिकाणी असे रोप सापडल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.

'गांजाच्या बिया कोण आणि कधी टाकतं?'

पोलिसांनी हे अमली पदार्थाचे रोप ताब्यात घेतले असले, तरी हा प्रकार पुन्हा कसा घडला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. फुटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या या रोपांच्या बिया नेमके कोण आणून टाकते किंवा कधीपासून हा प्रकार सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

या सततच्या घटनांमुळे शहरातील अमली पदार्थ विरोधी कारवायांवर आणि प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे कोणती टोळी किंवा व्यक्ती कार्यरत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT