Cancer  Dainik Gomantak
गोवा

लहान मुलांचा कर्करोग बरा होऊ शकतो: डॉ. महादेव स्वामी

मिरामार किनाऱ्यावर ‘यंग वॉरियर्स’ स्नेहमेळावा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोकर्मा ऑन्कॉलॉजी असोसिएशन, आयएमए डिचोली व मणिपाल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगाशी झुंज देणाऱ्या तसेच बऱ्या झालेल्या मुलांसाठी मिरामार समुद्र किनाऱ्यावर ‘यंग वॉरियर्स’ या नावाने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. महादेव स्वामी म्हणाले की, लहान मुले कर्करोगातून (Cancer) बरी होऊ शकतात. आता या आजारावर विविध उपचार आले आहेत. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांना लवकर बरे करू शकतो. जितक्या लवकर उपचार घेऊ तितक्या लवकर ही मुले सर्वसामान्य जीवन जगू शकतात.

डॉ. मनीष त्रिवेदी म्हणाले की, जी मुले कर्करोगातून मुक्त झाली आहेत किंवा लवकरच बरे होणार आहेत अशा मुलांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत करत आहोत. त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या आजाराविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. आयएमए डिचोलीच्या अध्यक्ष डॉ. मेधा साळकर म्हणाल्या, जेथे प्रेम असते, तेथे कोणत्याही प्रकारचा ताण नसतो याचा प्रत्यय आम्हाला या मुलांसोबत वेळ व्यतीत करताना आला. ही मुले आजार विसरून मुक्तपणे खेळली, बागडली हे पाहून आनंद झाला. या स्नेहमेळाव्यात मुलांनी (Children) विविध खेळ खेळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

EL Nino Impact Rain: 'अल निनो'चा प्रभाव जाणवू लागला, पुढचे सात दिवस 'कोरडे'; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Horoscope: सोमवती अमावस्येला जुळून येतायत शुभ योग; 'या' राशींचे चमकणार नशीब, कामाच्या ठिकाणी प्रगती आणि पदोन्नतीची संधी

Kadamba: गोव्याची राजकन्या, गुजरातची भाग्यविधाती: मायनल्लादेवीचा प्रेरणादायी इतिहास!

कोवळ्या वयात मातृत्वाचं ओझं! अल्पवयीन विद्यार्थिनीची जिल्हा रुग्णालयात प्रसूती, पोलिसांकडून पोक्सो कायद्यानुसार तपास सुरू

SCROLL FOR NEXT