India Canada Row 
गोवा

कॅनडा म्हणे गोव्यात सांभाळून... विदेशी महिलांवर बलात्कार, विनयभंगाचे प्रकार वाढलेत, सूचना प्रसिद्ध

खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचे वक्तव्य कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले.

Pramod Yadav

India Canada Row: खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचे वक्तव्य कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले. यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांना राजदुतांना माघारी पाठवले आहे. तसेच, आपापल्या नागरिकांसाठी सुरक्षासंबधित मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

कॅनडाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये गोव्याचा विशेष उल्लेख असून, येथे येणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन कॅनडा सरकारने केले आहे.

गोव्यात परदेशी महिलांवर बलात्कार आणि विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे गोव्यात आणि दिल्लीत विशेष काळजी घ्या. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, कोणत्या ठिकाणी काळजी घ्यावी हे देखील त्यांनी नमूद केले असून, यात सार्वजनिक वाहतूक, योगा केंद्र, आश्रम आणि विविध आध्यात्मिक केंद्र यांचा समावेश आहे.

दरम्यान, याबाबत गोवा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले असून, गोव्यात महिलांसाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच, यावर्षात परदेशी महिलेविरोधात कोणताही गंभीर गुन्हा घडल्याचे समोर आले नाही. असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कॅनडा आणि भारतात वाद का होतोय?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेलेत. कॅनडा आणि भारताने त्यांच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

ट्रूडो यांचे आरोप भारताने फेटाळले आहेत. त्यानंतर ट्रूडो नरमले असून, भारताला भडकवण्याचा आमचा प्रयत्न नाही तर त्यांनी यावर गांभीर्याने विचार करावा असे ट्रूडो म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT