Wayngan farming Dainik Gomantak
गोवा

Canacona:..यामुळे वायंगण शेतीची पेरणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Canacona: तरवा तयार होण्यास पंधरा ते एकवीस दिवसांचा कालावधी लागतो. काही शेतकऱ्यांचा कल मनुष्यबळाचा आधार घेऊन लागवड करण्याकडे आहे.

दैनिक गोमन्तक

Canacona: काणकोणात 50 हेक्टर वायंगण शेतजमिनीपैकी 46 हेक्टर जमिनीत यांत्रिक पद्धतीने लागवड करण्यात येते अशी माहिती विभागीय कृषी अधिकारी कीर्तीराज नाईक गावकर यांनी दिली. काणकोणात खरीप हंगामात 250 हेक्टर जमिनीत भात शेतीची लागवड करण्यात येते.

प्रत्येक चौरस मीटरमागे पन्नास टक्के अनुदान तत्त्वावर दीड रुपये शेतकऱ्यांना कृषी खात्याकडे भरणा करावे लागतात. लागवडीसाठी तरवाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पैंगीण येथील महेंद्र भंडारी व लोलये येथील जितेंद्र फडते या दोन युवकांनी कृषी खात्याच्या आर्थिक सहकार्याने ट्रान्सप्लांटिंग यंत्र खरेदी केले आहे. पहिल्या वर्षी फक्त 50हजार चौरस मीटर क्षेत्रात यांत्रिक पद्धतीने लागवड करण्याचे काम त्यांना मिळाले.

मात्र, त्यामध्ये सातत्याने वाढ होऊन यंदा तीन लाख चौरस मीटर झाली आहे. येणाऱ्या वर्षात त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे महेंद्र भंडारी व जितेंद्र फडते यांनी सांगितले.

काणकोणात वायंगण शेतीच्या पेरणीला यंदा उशिरा सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात वायंगण शेतीची पेरणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. कारण, पीक तयार होताना ऐन काळात पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी पेरणी लवकर आटोपली जाते.

तरवा तयार होण्यास पंधरा ते एकवीस दिवसांचा कालावधी लागतो. काही शेतकऱ्यांचा कल मनुष्यबळाचा आधार घेऊन लागवड करण्याकडे आहे.

लोटली येथील डॉन बॉस्को चॅरिटेबल ट्रस्टचे फादर जॉन काणकोणात येऊन यांत्रिक पद्धतीने लागवड करत होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व त्यांच्या सहकार्याने व विभागीय कृषी अधिकारी कीर्तीराज नाईक गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्र घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

यांत्रिकरणामुळे उत्पादन खर्च कमी होत असल्याने दरवर्षी पडिक जमीन लागवडीखाली येत असल्याचे पाहून समाधान होत आहे. - महेंद्र भंडारी व जितेंद्र फडते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT