Court Dainik Gomantak
गोवा

Cancona News: सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या शिक्षकाला जामीन मंजूर; काणकोण येथील घटना

सुशांत कुंकळयेकर

Canacona Student Assault Case: आमोणे-काणकोण येथील बलराम निवासी शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा आरोप असलेल्या प्रसाद पागी या शिक्षकाला शुक्रवारी बाल न्‍यायालयाने सशर्त जामिनावर मुक्‍त केले.

संशयिताने तपास अधिकार्‍यांना गरज वाटेल तेव्‍हा पोलीस स्‍थानकात हजर रहाणे, त्‍या विद्यार्‍थ्‍यावर किंवा इतर कुठल्‍याही साक्षीदारावर दबाव न आणणे तसेच न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या बाहेर न जाण्‍याच्‍या अटी घातल्‍या आहेत.

बाल न्‍यायालयाच्‍या अध्‍यक्ष सायोनारा लाड यांनी हा जामीन मंजूर केला. संशयिताला २० हजाराच्‍या वैयक्‍तिक आणि तेवढ्याच रकमेच्‍या अन्‍य एका हमीवर जामीन मुक्‍त करावे असा आदेश दिला. यावेळी संशयिताच्‍यावतीने ॲड. प्रशांत बोरकर यांनी बाजू मांडली.

दरम्‍यान, या शिक्षकाने त्‍या विद्यार्थ्याला मारहाण करुन फक्‍त बाल अधिकाराचा भंग केलेला नाही तर २ ऑक्‍टोबरच्‍या या कार्यक्रमाची माहिती विचारण्‍यास गेेलेल्‍या त्‍या विद्यार्‍थ्‍याला मारहाण करुन महात्‍मा गांधींचाही अपमान केला आहे.

त्‍यामुळे या शिक्षकाला शिक्षादान करण्‍याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. त्‍यामुळे त्‍याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी गाकुवेध फेडरेशन या संघटनेचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT