karmal Ghat Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: करमल घाटात अपघातांची मालिका सुरुच, रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता!

Traffic Jam: दर दिवशी किमान दोन अपघात पोळे ते बाळ्ळीपर्यंतच्या हमरस्त्यावर होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Karmal Ghat: काणकोण ते मडगाव हमरस्त्यावरील करमल घाटात अपघातांची मालिका सुरु असून काल मंगळूरहून येणारा कंटेनर कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. घाटातील रस्ता रुंद करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत वाहन चालकांनी व्यक्त केले. या हमरस्त्यावर दर दिवशी किमान दोन अपघात पोळे ते बाळ्ळीपर्यंतच्या हमरस्त्यावर होत आहेत.

करमल घाटात एक तर रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला दगड घालून मजबुती न दिल्याने अवजड वाहने रस्त्याच्या कडेला गेल्यास ती कलंडतात. त्यामुळे करमल घाटात वाहतूक कोंडी होते. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे वाहतूक कोडी नेहमीच होते.

काल मंगळूरहून गोव्यात चारचाकी वाहनांची वाहतूक करणारा एनएल 01, क्यू 1154 हा कंटेनर मडगावच्या बाजूने जात असताना दुसऱ्या समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या कडेला कलंडून वाहनाची चाके जमिनीत रूतली. हा अपघात ग्रस्त कंटेनरामुळे करमल घाटात वाहतूकीची कोंडी होऊ लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT