Canacona Program Konkani Vidyarthi Manch Organized Mallikarjun Chetan Manju Desai College Dainik Gomantak
गोवा

Canacona : विद्यार्थ्यांचे कलागुण जपणारा ‘उर्बारंग’

कोकणी विद्यार्थी मंचचा कार्यक्रम : मल्लिकार्जुन, चेतन मंजू देसाई महाविद्यालयांत आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona : श्री मल्लिकार्जुन आणि श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयांत कोकणी अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एकत्र आणण्यासाठी काणकोणमधील कोकणी विभागाच्या, कोकणी विद्यार्थी मंचतर्फे ‘उर्बारंग’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लोककला तज्ज्ञ व लेखक झिलू गावकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुचिता नाईक, कोकणी विभागप्रमुख डॉ. पूर्णानंद च्यारी, साहाय्यक प्राध्यापक प्रेमजीत वेळीप, सुप्रिया काणकोणकर उपस्थित होते.

शिक्षण घेत असतानाच तरुण वयात आयुष्यात येणाऱ्या संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच काणकोणसारख्या कलागुणांनी संपन्न शहरात वाढलेले अनेक कलाकार, अभ्यासक आहेत त्यांचा आदर्श प्रत्येकाने पाळावा, असे मत प्रमुख पाहुणे झिलू गावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.

शिक्षण, साहित्य आणि कला यांच्या एकत्रीकरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देण्याचा विभागाचा उद्देश आहे. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी ‘विद्यार्थी मंच’ संघटन व संघटन कौशल्य वाढवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्राचार्य डॉ. सुचिता नाईक यांनी मान्यवरांचे स्वागत करून विद्यार्थी मंचाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ कोमरपंत व करिना वेळीप यांनी केले. रश्मिता सुधीर यांनी आभार मानले.

उत्साहवर्धक स्पर्धा

या ऊर्जा रंगसंगतीमध्ये अभ्यासक्रमाशी संबंधित स्पर्धाही विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आयोजित केल्या होत्या. कोकणी ‘गीत गायन’चे पहिले पारितोषिक मॅक कार्नेरोला, दुसरे- स्टाररी कुलसीला आणि तिसरे- सूरज वेळीप आणि रिया कोमरपंत यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक समर्थ कोमरपंत, द्वितीय- वैष्णवी शेटकर आणि तृतीय- अनिकेत खणगीकर यांना मिळाले.

मंचची समिती

या कार्यक्रमात कोकणी विद्यार्थी मंचचे उद्‌घाटन करण्यात आले. अध्यक्षपदी- मॅक कार्नेरो, उपाध्यक्षपदी- समर्थ कोमरपंत, सचिवपदी- रश्मिता सुधीर, उपसचिवपदी- वैष्णवी शेटकर, खजिनदार- यशवंत भट आणि सदस्यपदी उत्कर्षा कोठारकर, सिद्धी पवार, निखिल पागी आणि अनुज लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT