Canacona Municipal Fish Market Dainik Gomantak
गोवा

Canacona Municipal Fish Market: काणकोण पालिका मासळी मार्केटात दुर्गंधीचे साम्राज्य, प्लास्टिकचा खच; प्रसाधनगृहाची वानवा

Canacona Municipal Fish Market Issues: काणकोण पालिका मासळी मार्केट परिसरात आत व बाहेर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. गटारातील सांडपाण्यात किडे वळवळत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: काणकोण पालिका मासळी मार्केट परिसरात आत व बाहेर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. गटारातील सांडपाण्यात किडे वळवळत आहेत. अशा परिस्थितीत मासे विक्रेत्या महिला येथे मासे विक्री करत आहेत.

या मासे विक्रेत्या महिलांना मासळी मार्केटमध्ये प्रसाधनगृहाची सोय नाही. मासळी मार्केटमध्ये असलेल्या प्रसाधनगृहाचा दरवाजा तुटून पडला आहे. मासळी मार्केटबाहेर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. त्यावर गुरे ताव मारीत आहेत.

येथील मासळी विक्रेत्यांना सुसज्ज मासळी मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेने नवीन मासळी मार्केट उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला. त्या प्रकल्पाची तीनवेळा निविदा जाहीर झाली. मात्र, प्रत्येकवेळी सिंगल टेंडर झाल्याने काम पुढे गेले नाही.

दरम्यान, काणकोण आरोग्य केंद्राच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरनी या मासळी मार्केटमधील दुर्गंधी व एकूण परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT