Canacona  Dainik Gomantak
गोवा

Canacona News : आमच्या संघर्षाचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिद्ध करू! तवडकर

Canacona News : बलराम शिक्षण संस्था, ‘आदर्श युवा’तर्फे संकल्प दिन साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, बाळ्ळी आंदोलनाचा विपरित इतिहास लिहून मला व्हिलन बनविण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला. १९९६ ते आजपर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या संघर्षाचा इतिहास वर्षभरात पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचा संकल्प सभापती रमेश तवडकर यांनी जाहीर केला.

बलराम एज्युकेशन सोसायटी आणि आदर्श युवा संघातर्फे शनिवारी (ता.२५) आदर्श ग्राम आमोणे येथे ‘संकल्प दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला बलराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर, उपाध्यक्ष गणेश गावकर, आदर्श युवा संघाचे अध्यक्ष जानू तवडकर, सचिव अशोक गावकर, कृष्णा वेळीप, अनुसूचित जमातीच्या मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, उपाध्यक्ष एथनी गावकर, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, अशोक गावकर उपस्थित होते. मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या प्रतिमेला सभापती रमेश तवडकर व अन्य उपस्थितांनी पुष्पहार अर्पण केला.

बिर्सा मुंडा व मंगेश गावकर यांची स्मारके उभारून ती श्रद्धास्थाने निर्माण करण्यात येणार आहेत. २००३ मध्ये गावडा, कुणबी वेळीप यांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळूनही त्यांच्या मागण्या मान्य होत नव्हत्या, त्यावेळी न्याय हक्कासाठी बाळ्ळी येथे आंदोलन छेडले होते.

त्या आंदोलनात गावडोंगरी येथील मंगेश गावकर व मोरपर्ला येथील दिलीप वेळीप हे दोन युवक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ आदर्श ग्राम आमोणे येथे संकल्प दिन कार्यक्रमाचे आयोजन केले, असे सभापतींनी सांगितले.

न्यायासाठी आंदोलने

स्वातंत्र्यानंतरही एसटी समाजाला घटनेने दिलेले अधिकार मिळाले नाहीत. २००३ मध्ये दर्जा मिळाला. मात्र, अधिकार मिळाले नसल्याने निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी आंदोलने छेडावी लागली. संपर्क अभियान, सरकारला निवेदने देणे, आंदोलन असा प्रवास अनुसूचित जमातीला न्याय हक्क प्राप्त करण्यासाठी करावा लागला, असे अंकुश गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT