India Energy Week  Dainik Gomantak
गोवा

India Energy Week : ‘ऊर्जा सप्ताहा’स बेतूल सज्ज; जगभरातून ३५ हजार प्रतिनिधी

India Energy Week : ४०० तज्ज्ञ वक्त्यांची उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

India Energy Week : काणकोण, ‘भारत ऊर्जा सप्ताह२०२४’ या भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघ (एफआयपीआय)च्या वतीने आयोजित सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन व परिषदेसाठी गोवा सज्ज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी उद्‍घाटन होणार आहे.

या सप्ताहानिमित्त १२०हून अधिक देशांतील ३५ हजारांहून अधिक प्रतिनिधींच्या सहभागाची अपेक्षा आहे. आयईडब्लूमध्ये ८० पेक्षा जास्त सत्रांमधून ४००हून अधिक तज्ज्ञ-वक्ते जागितक ऊर्जा क्षेत्राचा दृष्टिकोनाविषयी माहिती देणार आहेत. सप्ताहादरम्यान ३५०हून अधिक प्रदर्शन कंपन्या आणि ४०००हून अधिक निमंत्रितांचा सहभाग आहे.

केवळ दोन वर्षांच्या कालावधीतच भारत ऊर्जा सप्ताह जागतिक ऊर्जा उपक्रमांमधील एक प्रमुख उपक्रम बनला आहे. सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था, वाढता ग्राहक आधार आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण यामुळे आम्ही जागतिक ऊर्जा क्षेत्रामध्ये एक ठळक स्थान निर्माण केले आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले.

२०२३ च्या पहिल्या सप्ताहास मिळालेला प्रतिसाद आणि यश या आधारे यंदा ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत भारत ऊर्जा सप्ताह-२०२४चे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी केंद्रातील नोडल मंत्रालय आणि गोवा प्रशासनासह विविध सरकारी विभाग लॉजिस्टिक सुविधा व तयारी चोख करण्याबरोबरच पर्यावरण बाबींचीही सुनिश्चितता करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

गोलमेज बैठकांचे आयोजन

ऊर्जासप्ताहात मंत्री स्तरीय, नेतृत्वविषयक, तांत्रिक सत्रे आणि गोलमेज बैठका होणार असून या माध्यमातून विविध संकल्पनांवर विचारमंथन केले जाणार आहे.

ऊर्जा क्षेत्राशी निगडीत ज्ञानाची देवाणघेवाण

भारत ऊर्जा सप्ताहामध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अर्थपूर्ण चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ, धुरीण, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासाठी परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हा सप्ताह उत्प्रेरक ठरणार आहे.

देशाचा आव्हानांना सकारात्मक प्रतिसाद

एकाच वेळी ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा संक्रमण सुनिश्चित करण्याच्या आव्हानांना पर्याय देण्यात भारताने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

देशांतर्गत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्खनन आणि उत्पादन वाढवणे, आयात कमी करण्यासाठी आणि इंधनाचे दर नियंत्रणात राखण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वेगाने वाढवणे ,अशा वैविध्यपूर्ण उपाययोजनांतून भारताने ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT