Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Canacona Crime News: तालुक्यातील गावडोंगरी येथील फुलमोल भागात एका 23 वर्षीय तरुणावर त्याच्याच चुलत भावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली.

Manish Jadhav

काणकोण: काणकोणात सध्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली. तालुक्यातील गावडोंगरी येथील फुलमोल भागात एका 23 वर्षीय तरुणावर त्याच्याच चुलत भावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. कौटुंबिक वादाचे रुपांतर हिंसक संघर्षात झाल्याने एका तरुणाचा जीव टांगणीला लागला असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

विळा आणि दगडाने हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मधु झोरे (वय 23) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गावडोंगरी येथील फुलमोल येथे मधु आणि त्याच्या चुलत भावामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या चुलत भावाने घरातील धारदार विळा आणि दगडाने मधुवर हल्ला केला. या हल्ल्यात मधुच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. कौटुंबिक वादातून झालेल्या या भीषण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रकृती चिंताजनक

घटनेनंतर तात्काळ जखमी मधुला स्थानिकांच्या मदतीने काणकोण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) हलवण्यात आले आहे. मधुची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असून डॉक्टर त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

पोलिस तपास सुरु

दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रामिक तपासानुसार, हा हल्ला कौटुंबिक वादातून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. जमिनीचा वाद किंवा जुन्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT