Canacona  Dainik Gomantak
गोवा

Canacona News : सर्जनशील ‘मनोशोभा कलाघर’ : डॉ. राजय पवार

Canacona News : डॉ. पवार यांच्यासोबत नाट्यकर्मी व महिला उद्योजक सुनीता गावणेकर व सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रकाश आचार्य यांनी ‘मनोशोभा कलाघरा’बरोबरच ‘संजीव प्रभुदेसाई कालोत्सवा’तील चार दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे पारंपरिक पद्धतीने उद्‌घाटन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, डोंगराच्या कुशीत वसलेले पारंपरिक घर, पुढे अंगण व मंडप, त्यापुढे खुल्या नाट्यगृहातील खुला रंगमंच, पुढे कुळागर व त्यापुढे पसरलेली शेती व संथ वाहणारी नदी अशा निसर्गरम्य वातावरणातील ‘मनोशोभा कलाघर’ हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच नव्हे तर सर्जनशील साहित्यिकांना प्रेरणा देणारे व परिसंवाद वा कार्यशाळांसाठी यथायोग्य स्थान आहे, असे मत कला अकादमी गोवाच्या नाट्य महाविद्यालयाचे प्राचार्य व रंगकर्मी डॉ. राजय पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. पवार यांच्यासोबत नाट्यकर्मी व महिला उद्योजक सुनीता गावणेकर व सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रकाश आचार्य यांनी ‘मनोशोभा कलाघरा’बरोबरच ‘संजीव प्रभुदेसाई कालोत्सवा’तील चार दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे पारंपरिक पद्धतीने उद्‌घाटन केले.

नाटकाची घंटा तीनदा वाजवून, नांदी गाऊन व दीपप्रज्वलन करून या संकुलाचे उद्‌घाटन अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर काणकोणमधील लोलये गावातील आगस वाड्यावर शेकडो रसिकांच्या उपस्थितीत पार पडले.

प्रभुदेसाई दाम्पत्याचे ज्येष्ठ सुपुत्र संदीप प्रभुदेसाई यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पद्मा भट व केतन भट यांच्या संचाने नांदी सादर केली. संजय पागी व महादेव लोलयेकर यांनी हार्मोनियम व तबल्याची साथ केली. संदेश प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक केले आणि निम्न-व्यावसायिक स्तरावर ‘मनोशोभा कलाघर’ सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचे व हा अभिनव प्रयोगशील नाट्यकृतींचा ‘कालोत्सव’ दरवर्षी होणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर या कालोत्सवातील पहिले नाटक रंगमंचावर नव्हे तर मंडपातील अंगणात सादर करण्यात आले. ‘अमर अमृता’ हे नाटक प्रथमेश केरकर व वैष्णवी पै काकोडे यांनी सादर केले.

नाट्यअभिनयासाठी संघर्ष

१ ज्या काळात महिला रंगमंचावर येत नसत त्याकाळी १९६४ मध्ये पुराणमतवादींच्या क्षोभाला तोंड देत शोभा प्रभुदेसाईंसोबत आपण शाळकरी मुलगी असताना ‘एकच प्याला’ नाटकात काम केले. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. त्यातूनच उच्चभ्रू समाजातील महिला नाटकातून कशा अभिनय करू लागल्या त्या आठवणींना यावेळी सुनिता गावणेकर यांनी उजाळा दिला.

२ मनोहर व शोभा प्रभुदेसाईंच्या जत्रांतील नाट्यसंचातून आपण कसे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले व नंतर नाट्यदिग्दर्शन करून कला अकादमीसारख्या राज्यस्तरावरील नाट्यस्पर्धांतून प्रथम क्रमांकाची बक्षिसे कशी पटकावली ते यावेळी प्रकाश आचार्य यांनी विशद केले.

नाट्यकलाकारांचा सत्कारः

यावेळी प्रभुदेसाई कुटुंबाच्या नाट्यसंचात भूमिका सादर केलेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यात उर्मिला प्रभुदेसाई, संध्या कामत, डॉ. पांडुरंग फळदेसाई, कल्पना कामत, शंभू प्रभुदेसाई, केतन भट, तनुजा लोलयेकर, राजेश प्रभू, रूपाली बोर्तामुली, वृंदा प्रभुदेसाई, गीता प्रभुदेसाई व डॉ. पद्मिनी प्रभुदेसाई यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

India Pakistan Tension: 'भारत- पाकिस्तानमधील अणुयुद्ध मी थांबविले'! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT