Canacona Molestation Case Dainik Gomantak
गोवा

समुद्रकिनाऱ्यावर कसं जायचं? विचारत छातीवर हात टाकला, काणकोण येथे महिलेचा विनयभंग; तक्रार नोंदविण्यास पोलिसांचा नकार

Canacona Molestation Case: दुमाणे-काणकोण येथे एका महिला दुचाकीचालकाचा एका दुचाकीचालकाने विनयभंग केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

आगोंद: दुमाणे-काणकोण येथे एका महिला दुचाकीचालकाचा एका दुचाकीचालकाने विनयभंग केला. मात्र, काणकोण पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास टाळाटाळ करून फक्त मोबाईल क्रमांक लिहून घरी पाठविले, असे पीडित महिलेने पत्रकारांना सांगितले.

ही महिला काणकोण पोलिस ठाण्याजवळच गेल्या पाच वर्षांपासून राहते. शुक्रवारी सायंकाळी आगोंद येथे एका मैत्रिणीला भेटून घरी परतताना ७.४५ च्या सुमारास दुमाणे येथे आलेल्या एका दुचाकीचालकाने वाहनावरून ‘पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर कसे जायचे?’ असे विचारत अचानक माझ्या छातीवर हात टाकला.

पण मी त्याचा जोरदार प्रतिकार करून तेथून पसार झाले. अशी स्थिती आणखी कोणावर येऊ नये, यासाठी काणकोण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याने माझी तक्रार न नोंदवताच फक्त माझा मोबाईल क्रमांक लिहून घेतला, तसेच पोलिस गस्त वाढवू, असे सांगून मला माघारी पाठविले. या प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने पत्रकारांशी बोलताना केली.

दुमाणे-काणकोण मार्गावर अंधाराचे साम्राज्य

ही घटना घडली, त्याठिकाणी ५०० मीटर लांब रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. त्याठिकाणी पथदिवे लावावेत, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

मी देशभरात अनेक ठिकाणी राहिले असून काणकोण हे ठिकाण मला सर्वांत सुरक्षित वाटते. मात्र, या प्रकारामुळे भीती निर्माण झाली आहे, असे पीडितेने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT