Turtles Dainik Gomantak
गोवा

Canacona : अंडी घालून निघालेल्या कासवांवर पुष्पवृष्टी

काणकोणात रंगला अनोखा निरोप सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

Cancona Tortoises Showered With Flowers: येथील पाटणे आणि गालजीबाग किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांचे पूजन करून त्याला आदरपूर्वक समुद्रात सोडण्यात आले.

यावेळी किनाऱ्यावर रंगलेल्या आगळ्यावेगळ्या निरोप समारंभाला देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिकांनीही गर्दी केली होती.

पाटणे किनाऱ्यावर दुपारी आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाने ८९ अंडी घातली. परत जाताना स्थानिकांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली.

गालजीबाग किनाऱ्यावरही सागरी कासवाचे दुपारी आगमन झाले. पर्यटक व स्थानिकांनी अंडी घालून परतणाऱ्या या सागरी कासवाचे दर्शन घेतले.

यंदा आगोंद किनाऱ्यावर सागरी कासवांचे आगमन होण्याची अपेक्षा सागरी कासव प्रकल्पाच्या दक्षिण गोवा झोनचे उपक्षेत्रिय वनाधिकारी राजेश नाईक यांनी व्यक्त केली.

गालजीबाग किनाऱ्यावरून या हंगामातील पहिल्या सागरी कासवांच्या घरट्यातून ६७ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

आगोंद वगळता दक्षिण गोव्यात कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातल्यास त्यांच्या संरक्षणासाठी ती गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित करण्यात येतात. एका घरट्यातून पिल्ले बाहेर येण्यास सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाते.

-राजेश नाईक, वन अधिकारी, दक्षिण गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

SCROLL FOR NEXT