Canacona Citizens Dainik Gomantak
गोवा

Canacona News : काणकोण आरोग्य केंद्राचे ‘आरोग्य’ सुधारा! जनतेची मागणी

Canacona News : उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सुधारा, अशी मागणी नागरिकांनी उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

यापूर्वी आरोग्य कल्याण समितीच्या सदस्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते, त्याला अनुसरून उपजिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आरोग्य कल्याण समितीचे सदस्य व नागरिकांची

बैठक घेऊन यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बैठकीला मामलेदार जितेंद्र बुगडे, आरोग्याधिकारी जोस तावारीस, गटविकास अधिकारी सावियो कार्व्हालो, डॉ. दिवाकर वेळीप, त्याचप्रमाणे आरोग्य कल्याण समितीचे डायगो डिसिल्वा, अनिल भगत, होनेरात फर्नांडिस, संजय कोमरपंत, नगरसेवक सायमन रिबेरो, सारा नाईक देसाई, अमिता पागी तसेच शिरिष पै, माजी नगरसेवक स्टेन्ली ग्रासियस, एरविल बार्रेटो, जॉन बार्रेटो, लुईस बार्रेटो व इतर नागरिक उपस्थित होते.

आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता आहे. रुग्णांची रक्त तपासणी सकाळी लवकर करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. त्याशिवाय रुग्णवाहिका असूनही त्याचा वापर केला जात नाही.

काही वेळेला रुग्णवाहिका चालकांना आणीबाणीच्या वेळी फोन करून बोलावण्याची वेळ डॉक्टरांवर येत असते. उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी अकस्मात आरोग्य केंद्राला भेट देऊन अधूनमधून पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT