Goa Canacona Dam Dainik Gomantak
गोवा

Goa Dam: काणकोणात डिसेंबरअखेरीस सर्व बंधाऱ्यांत पाणी अडविण्यात येणार

Goa Dam: गोव्यातील चाळीस बंधाऱ्यांपैकी काही बंधाऱ्यांत पाणी अडविण्याची प्रक्रिया जलस्रोत खात्याकडून सुरु करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Dam: काणकोणातील वेगवेगळ्या जलस्रोतांवर असलेल्या चाळीस बंधाऱ्यांपैकी काही बंधाऱ्यांत पाणी अडविण्याची प्रक्रिया जलस्रोत खात्याकडून सुरु करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व बंधाऱ्यांत पाणी अडविण्यात येणार आहे, असे जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी सांगितले.

माशे येथील गालजीबाग नदीच्या उपनदी असलेल्या वाकडे न्हंयमधील गांडे बंधारा, त्याशिवाय बाबरे खाडी व माशे येथील श्री निराकार देवालयाच्या पाठीमागे असलेल्या बंधाऱ्यांत पाणी अडविण्यात आले आहे. हे बंधारे माती भरून पाणी अडविणे गरजेचे असते. नदीच्या वरच्या पात्राचे खाऱ्या पाण्यापासून रक्षण करण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होत असतो.

दरम्यान, त्याचप्रमाणे गालजीबाग नदी पात्रातील भटाबांध बंधाऱ्यात फळ्या रचून त्यानंतर त्यामध्ये माती घालून भरतीच्या वेळी नदीच्या वरच्या पात्रात शिरणारे खारे पाणी अडविण्यात येते त्या बंधाऱ्याही पाणी अडविण्यात आले आहे. त्याशिवाय गालजीबाग नदीतील चिमटाबांध, बोरूस, काळशी या बंधाऱ्यातही पाणी अडविण्यात आले आहे.

गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील बंधाऱ्यात व तळपण नदी पात्रातील बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर देवाबाग व आगोंद पंचायत क्षेत्रातील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येणार आहे. यंदा नोव्हेंबरपर्यत अधुनमधून पावसाचा शिडकावा झाल्याने जलस्रोत अद्यापही प्रवाहीत असल्याचे जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी सांगितले.

तसेच, या बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे भूगर्भ पातळीत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे काही बंधाऱ्यांचा उपयोग वायंगण शेती व भाजी लागवडीच्या जलसिंचनासाठी करण्यात येत आहे. जल दुर्भिक्ष गावडोंगरी व खोतीगावात हे बंधारे तेथील रहिवाशांना वरदान ठरले आहेत.

प्रवाहित बंधाऱ्यांत पाणी अडविण्यास विलंब

जे जलस्रोत अद्यापही प्रवाहित आहेत त्या जलस्रोत बंधाऱ्यांत पाणी अडविण्यासाठी विलंब करण्यात येत आहे. अर्धफोंड येथील तळपण नदीतील डोहातील पाणीपुरवठा प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यात याच कारणासाठी अद्याप पाणी अडविण्यात आले नाही. या ठिकाणी जलस्रोत प्रवाही असल्याने बंधाऱ्यांची बांधणी केल्यानंतर एका दिवसात बंधारा तुडुंब भरून वाहू लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT