Pramod Sawant|Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Camurlim School: ‘त्‍या’ शिक्षिका बडतर्फ झाल्‍या तरी हरकत नाही; कामुर्ली घटनेबाबत मुखमंत्र्यांची कडक भूमिका

Camurlim Student Assault Case: विद्यार्थी मारहाणप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी सुजल गावडे आणि कनिषा गडेकर या निलंबित शिक्षिकांना शिक्षकदिनी रितसर अटक केली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कामुर्ली येथील विद्यार्थी मारहाणप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी सुजल गावडे आणि कनिषा गडेकर या निलंबित शिक्षिकांना गुरुवारी शिक्षकदिनी रितसर अटक केली. याप्रकरणी सकाळी पोलिसांच्‍या कार्यपद्धतीवर सडकून टीका करणाऱ्या मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सायंकाळी मात्र ‘यू टर्न’ घेतला.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्‍यांची कानउघाडणी केली. सकाळी तपासकामावरच बोट ठेवत संबंधित स्थानकाचे निरीक्षक तसेच तपास अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी करणारे मंत्री हळर्णकर सायंकाळी वरमले. मारहाणप्रकरणी शिक्षिकांवर अटकेची कारवाई झाल्‍याने अनेकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे. भविष्‍यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शिक्षण खात्‍याने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

कुंभारजुवेतील मुख्याध्यापिकेची बदली रद्द; ‘त्‍या’ शिक्षिका बडतर्फ झाल्‍या तरी हरकत नाही

मुलांना बेदम मारणाऱ्या शिक्षकांना शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही शाळेच्या व्यवस्थापनाला बोलावून त्या दोन्ही शिक्षिकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आम्ही कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही. कायद्यांतर्गत जी शिक्षा अपेक्षित आहे ती त्यांना होणारच आहे. त्यांना नोकरीतून काढले तरीदेखील मला काहीच फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

कुंभारजुवे येथील प्राथमिक शाळेच्‍या शिक्षिकेची झालेली बदली रद्द करावी, अशी मागणी करत आझाद मैदानावर विद्यार्थ्यांसह पालकांनी धरणे आंदोलन केले. त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी कठोरपणे भाष्‍य केले. दरम्‍यान, सरकारी प्राथमिक शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका मंगला गावडे यांची बदली शिक्षण खात्‍याकडून रद्द करण्‍यात आली. या संदर्भात संचालक शैलेश झिंगडे यांनी दुजोरा दिला.

सात तासांत विचारात बदल

वेळ : सकाळी ११.१५

मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सकाळी पोलिस निरीक्षक आणि तपास अधिकारी काम योग्य प्रकारे करत नसल्याचा आरोप करून दोघांनाही निलंबित करण्याची मागणी केली होती.

वेळ : सायंकाळी ६.००

संध्याकाळी अवघ्या सात तासांत मंत्री हळर्णकर यांच्या विचारात बदल झाला आणि पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, पोलिसांना निलंबित करण्‍याची गरज नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT