Aleixo Reginaldo Lourenco|Global Konkani Forum Dainik Gomantak
गोवा

Romi Konkani: ‘खुर्ची हवी की रोमी कोकणी’ घोषणेवरुन वाद, कुडतरीचे आमदार म्हणाले, आम्हाला जनतेनं निवडून दिलंय, विसरू नका!

Aleixo Reginaldo Lourenco: रोमी कोकणीसाठी कुणीही काही केले नाही असा दावा फोरमतर्फे करण्‍यात येत आहे तो चुकीचा; रेजिनाल्‍ड यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Romi Konkani Official Language Campaign

मडगाव: रोमी लिपीला राजभाषा कायद्यात स्‍थान मिळावे यासाठी मोहीम हाती घेतलेल्‍या ग्‍लोबल कोकणी फोरमची ‘खुर्ची हवी की रोमी कोकणी’ ही भाषा धमकीची आहे. आम्‍हाला आमच्‍या मतदारांनी निवडून दिले आहे, हे या फोरमने लक्षात ठेवावे, असा इशारा कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी दिला. तर आमदारांना ही भाषा धमकीची वाटत असेल तर तो त्‍यांचा प्रश्‍न. मात्र निवडणुकीवेळीही आम्‍ही हीच भाषा वापरणार, असे प्रत्‍युत्तर ग्‍लोबल कोकणी फोरमने त्‍यांना दिले.

ग्‍लोबल काेकणीचे प्रतिनिधी आपले निवेदन रेजिनाल्‍ड यांना देण्‍यास काल कुडतरीला गेले होते. त्‍यावेळी रेजिनाल्‍ड आणि फोरमच्‍या प्रतिनिधींचा खटका उडाला. रोमी कोकणीसाठी यापूर्वी कुणीही काही केले नाही, असा जो दावा फोरमतर्फे करण्‍यात येत आहे तोही चुकीचा आहे. यापूर्वी मी स्‍वत: राेमी कोकणीसाठी आवाज उठविला आहे. माजी आमदार राधाराव ग्रासियस आणि इतरांनीही तो उठविला आहे, हे फोरमने विसरू नये,असेही ते म्‍हणाले.

रोमीला राजभाषा कायद्यात स्‍थान द्या, अशी मागणी करण्‍यास कुठलीही हरकत नाही. मात्र यासाठी सर्व आमदारांमध्‍ये एकमत व्‍हायला पाहिजे. विधानसभेत जर असे एकमत झाले तर माझाही त्‍याला पाठिंबा असेल, असे त्‍यांनी सांगितले. या फोरमचे उपाध्‍यक्ष जुझे साल्‍वादोर फर्नांडिस यांनी, रेजिनाल्‍ड यांच्‍या वक्‍तव्‍याला आक्षेत घेतला.

आमची भाषा आमदाराला धमकीची का वाटली, तेच कळत नाही. आम्‍ही आमची मागणी घेऊन सर्व आमदारांकडे जाणार आहोत. तसेच आम्‍ही रेजिनाल्‍ड यांच्‍याकडे आज आलो होतो. आम्‍हाला या प्रश्‍नावर राजकारण करायचे नाही. पण रोमी कोकणीला तिचे हक्‍काचे स्‍थान मिळावे, हीच आमची मागणी आहे.
केनेडी आफोन्‍साे, ग्‍लोबल कोकणी फोरमचे अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT