Calangute silent march Dainik Gomantak
गोवा

Calangute : अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात कळंगुट ग्रामस्थ एकवटले; 8 जानेवारीला मुक मोर्चा

आपले गाव वाचविण्यासाठी आमच्यात सहभागी व्हा, कळंगुट ग्रामस्थांच्या वतीने आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी कळंगुट समुद्रकिनारी एका पंच सदस्यांच्या मुलासह दोघांना मारहाण झाली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंचायतीने डान्सबार विरोधात मोहीम सुरू केली होती. कळंगुटमध्ये अवैधरित्या चालणारे सोळाही डान्सबार पंचायतीने बंद केले होते. दरम्यान, कळंगुट ग्रामस्थ 8 जानेवारीला डान्सबार विरोधात मोर्चा काढणार आहेत. "आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण आपल्या गावाचे रक्षण करूया. आपण आणि आपल्या परिवारास ही नम्र विनंती आहे की आपण आपले गाव वाचविण्यासाठी आमच्यात सहभागी व्हावे असे आवाहन कळंगुट ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

8 जानेवारीला डान्सबार विरोधात मोर्चा काढणार असल्याची माहिती प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली. त्यामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय आणि इतर सर्व बेकायदेशीर कृत्ये आमच्या गावात केली जात आहेत. आमचे गाव या सर्व बेकायदेशीर कृत्यांपासून वाचावे यासाठी कळंगुट व परिसरातील ग्रामस्थांसह आम्ही कळंगुटचे तरुण 8 जानेवारी रोजी दुपारी 4:00 वाजता जांभळेश्‍वर मंदिर ते बागा असा शांततापूर्ण निषेध मोर्चा काढत आहोत. या मोर्चासाठी काळ्या रंगाचा पोशाख असणार आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण आपल्या गावाचे रक्षण करूया. आपले गाव वाचविण्यासाठी आमच्यात सहभागी व्हावे असे प्रसिध्दिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून डान्सबार व मसाज पार्लरच्या नावे चालणाऱ्या गैरकृत्यांमुळे कळंगुटचे नाव बदनाम होत आहे. टाऊट्स (दलाल) लोक देशी पर्यटकांना सर्वकाही पुरवण्याचे आमिष दाखवून व नंतर त्यांना डान्सबार तसेच मसाज पार्लरमध्ये नेऊन त्यांना मारझोड करून लुबाडत आहेत. हे प्रकार कळंगुटमध्ये सर्रासपणे घडत आहेत. शिवाय या डान्सबारच्या नावाखाली सदर ठिकाणी इतर अवैध धंदे चालवले जात आहेत अशी तक्रार स्थानिकांतून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT