Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Crime in Goa Hotels : बिष्णोई गँगची माणसं आहे! दारूच्या नशेत तंगाट पर्यटकांचा कळंगुट येथील हॉटेलमध्ये राडा; पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

Goa Crime : गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कळंगुट येथे जयपूरहून आलेल्या दोन पर्यटकांनी केलेल्या गोंधळामुळे खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कळंगुट येथे जयपूरहून आलेल्या दोन पर्यटकांनी केलेल्या गोंधळामुळे खळबळ उडाली आहे. कळंगुट परिसरातील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत या दोघांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पर्यटकांना ताब्यात घेतले. गोंधळानंतर पोलिस स्टेशनकडे नेत असताना त्यांनी पोलिसांशी उर्मट वागणूक दाखवली. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःला ‘बिश्नोई टोळीचे सदस्य’ असल्याचा दावा केला आणि “आमच्याविरुद्ध कोणीही कारवाई करू शकत नाही” अशी उघडपणे बढाई मारली. या दरम्यान त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

गोव्यात पर्यटकांकडून वाढत्या गैरवर्तनाच्या घटनांमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. कळंगुट, बागा, हणजूण या पर्यटनस्थळांवर विशेष गस्त वाढवण्यात आली असून, अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही अशा मद्यधुंद पर्यटकांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे. गोवा हा शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो, मात्र काही पर्यटकांच्या बेफिकीर वर्तनामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT