Arrest Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: शॅक्समालकांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

Fake IAS Officers Calangute Arrest Case: कळंगुट परिसरातील शॅक्‍स, क्लबचालकांना ‘आयएएस’ अधिकारी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करणारा मनोज कुमार याला कळंगुट पोलिसांनी अटक केली.

Sameer Panditrao

Police arrest Fake Ias Officer for blackmailing shack and club owners in Calangute

पणजी/कळंगुट: कळंगुट परिसरातील शॅक्‍स तसेच क्लबचालकांना ‘आयएएस’ अधिकारी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करणारा व त्यांची आस्थापने बंद करण्याची धमकी देणारा मनोज कुमार (वय ३१ वर्षे, रा. छत्तीसगड) याला कळंगुट पोलिसांनी अटक केली.

त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे असलेले आयएएस अधिकाऱ्याचे ओळखपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्याला कळंगुट येथील एका हॉटेलमधून अटक केल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. तोतया आयएएस अधिकारी मनोज कुमार हा यापूर्वी ५ डिसेंबर रोजी गोव्यात आला होता.

एक टॅक्सी भाडेपट्टीवर घेऊन एका हॉटेलमध्‍ये राहून गेला होता. त्यानंतर तो गोव्यातून निघून गेला आणि पुन्हा २० डिसेंबर रोजी गोव्यात आला, तेव्हा आपण ओडिशा येथील आयएएस अधिकारी असून लवकरच गोव्यात बदली होणार असल्याचे सांगत तो मोफत टॅक्‍सी सेवा घेत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT