Crime News Dainik Gomantak
गोवा

सामूहिक बलात्कारप्रकरणातील तपासकामाबाबत टोलवाटोलवी

पीडित महिलेच्या जबानीवरून पोलिसांत गुन्हा नोंद

दैनिक गोमन्तक डिजिटल

बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात उपचार सुरू असलेल्या सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील पीडित महिलेच्या जबानीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मात्र त्याचा तपास कोणी करायचा यावरून अजून निर्णय झालेला नाही.

हे प्रकरण कळंगुट पोलिसांनी पणजी महिला पोलिस स्थानकाकडे वर्ग केले असले तरी त्याची फाईल काल संध्याकाळपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाबाबत टोलवाटोलवी सुरू आहे. सहा दिवस उलटले तरी संशयित मोकाट आहेत.

कळंगुट पोलिसांनी महिला पोलिस स्थानकाकडे वर्ग केलेली फाईल अजूनही आलेली नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पीडित महिला ही मनोरुग्ण इस्पितळात उपचार घेत असून एनजीओंच्या मदतीने तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या सामूहिक बलात्कारप्रकरणातील संशयितांना शोधण्याबाबत अजून तपासही सुरू झालेला नाही. ज्या दिवशी तिने सामूहिक बलात्कार झाल्याची जबानी दिली, त्यावेळी पोलिस यंत्रणेने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करण्याची आवश्‍यकता होती. तिची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद व्हायला हवी होती, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

गेल्या 22 फेब्रुवारीला ही पीडित महिला पणजी बसस्थानकावर लोकांवर दगडफेक करत असल्याने पणजी पोलिस स्थानकात आणून तिची जबानी नोंद करण्यात आली होती.

तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने तिला मनोरुग्ण इस्पितळात दाखल केले. त्यानंतर तिची जबानी नोंद केल्यावर हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीशी फारकत झाल्याने ती बॉयफ्रेंडसमवेत आली होती व त्याचेही मित्रही आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT