Arrest Canva
गोवा

Diodita Fernandes Murder Case: दिओदिता फर्नांडिस हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील दोघे गजाआड; कळंगुट पोलिसांची कारवाई!

Manish Jadhav

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून नायकावाडा कळंगुट येथील हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. यातच आता, नायकावाडा येथील दिओदिता फर्नांडिस यांचा गळा आवळून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही शेजारील महाराष्ट्रातील आहेत. आकिब उर्फ शौकत खल्पे (रत्नागिरी, महाराष्ट्र) आणि निखिल चंद्रकांत राजे (पुणे, महाराष्ट्र) अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कळंगुट पोलिस या दोघांच्या मागावर होते. अखेर या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, नायकावाडा कळंगुट येथे मृत सापडलेल्या दिओदिता फर्नांडिस (64, करासवाडा म्हापसा) यांचा गळा आवळूनच खून झाल्याचे पोस्टमार्टममधून समोर आले होते. तर दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांची ओळख पटवली होती. संशयित शेजारील राज्यात (महाराष्ट्र) पळून गेल्यामुळे पोलीस पथके त्यांचा माग काढण्यासाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती.

शुक्रवारी (23 ऑगस्ट रोजी) नायकावाडा येथील बेन्सन ई नामक इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील प्लॅटमध्ये दिओदिता फर्नांडिस यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. कळंगुट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुन शुक्रवारीच खून आणि लुटमारीच्या गुन्ह्याची नोंद केली होती. दिओदिता यांच्या भावजींनी पोलिसांत तक्रार दिली होती. शनिवारी सकाळी पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले की, दोरीच्या सहाय्याने गळा आवळून दिओदिता यांचा खून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, दिओदिता यांचा मृतदेह पाहिल्यानंतर आणि प्लॅटला बाहेरुन कुलूप लावण्यात आल्याने हा खूनाचाच प्रकार असल्याचे दिओदिता यांच्या नातेवाईकांनी दावा केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT