Calangute Drug Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Drug Case: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई

कळंगुट पोलिसांनी 2 लाख 60 हजारांचे अमली पदार्थ जप्त

Rajat Sawant

Calangute Drug Case: गोव्यात वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. डॉल्फिन सर्कल येथे कळंगुट पोलिसांनी अंमली पदार्थांवर छापा टाकल्याचे वृत्त समोर आले असून यात एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाईकवाडो कळंगुट येथील डॉल्फिन सर्कलजवळ एका ग्राहकाला अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक संशयित दुचाकी घेवून येणार असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयित सर्कलजवळ आला असता पोलिसांनी छापा टाकत संशयिताची व त्याच्या दुचाकीची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे 2.610 किलोग्रॅम गांजा आढळून आला.

या कारवाईत कळंगुट पोलिसांनी संशयित रामप्रिया कुमार चौधरी, वय 22 वर्षे, डिचोली, मूळ बिहार याला अटक केली. तसेच त्याच्याकडील 2 लाख 60 हजारांचा गांजा व दुचाकी जप्त केली.

त्याच्यावर एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कळंगुट  पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT