Calangute Panchayat Dainik Goamantak
गोवा

Calangute Panchayat: उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेल्सना मोठा दणका! कळंगुट पंचायतीची तब्बल 66 आस्थापनांवर कडक कारवाई

Calangute Panchayat Sewage Notices: कळंगुट परिसरातील खुल्या गटारांमध्ये व नाल्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेल्स व गेस्ट हाऊसेसविरोधात कळंगुट ग्रामपंचायतीने कारवाई सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कळंगुट परिसरातील खुल्या गटारांमध्ये व नाल्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेल्स व गेस्ट हाऊसेसविरोधात कळंगुट ग्रामपंचायतीने कारवाई सुरू केली आहे. स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेत ६६ व्यावसायिक आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी ग्रामसभेत दिली.

आरोग्य व पर्यावरणाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर लक्ष ठेवण्यासाठी पंचायतीने अचानक तपासणी सुरू केली असून, जुन्या व्यावसायिक मालमत्तांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व शोषखड्ड्यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, ग्रामसभेत बागा येथील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पावर चर्चा झाली. स्थानिक रहिवासी मॅन्युएल कार्दोज यांनी पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे सांगितले. यावर सरपंचांनी वाढत्या गरजेमुळे हा प्रकल्प आवश्यक असून गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ त्याचे नियोजन करत असल्याचे स्पष्ट केले.

लोकहितार्थ प्रकल्प : सरपंचांचे म्हणणे

‘बोआ वियागेम’ येथील नियोजित क्रीडा संकुलाला कळंगुट कोमुनिदाद व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला आहे. कोमुनिदाद जमिनीवर पूर्वपरवानगीशिवाय प्रकल्पाची घोषणा केल्याचा आरोप करत समिती सदस्यांनी स्पष्ट केले की, पंचायतीने आधी रितसर अर्ज सादर करावा, जो मंजुरीसाठी कोमुनिदादच्या जनरल बॉडीसमोर ठेवला जाईल. तर सरपंचांनी हा लोकहितार्थ प्रकल्प असून यासाठी आधीच जाहीर नोटीस काढण्यात आली असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT