Calnagute Vehicle Ban Dainik Gomantak
गोवा

Calangute: पर्यटन हंगामामुळे 'कळंगुट'मध्ये अवजड वाहतुकीला बंदी! जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Heavy Vehice Banned At Calangute: पर्यटन हंगामादरम्यान वाहतुकीची सुरक्षा आणि पर्यटकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि असुविधा टाळण्यासाठी हा आदेश महत्त्वाचा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Heavy Vehice Banned At Calangute

पणजी: बार्देश तालुक्यातील कळंगुट पंचायत क्षेत्रात पर्यटन हंगामादरम्यान अवजड वाहतुकीवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि ११६ अंतर्गत अधिकार वापरून हे आदेश जारी केले आहेत. ही बंदी २५ डिसेंबर पासून ५ जानेवारी २०२५ पर्यंत लागू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रहदारी नियंत्रित करून सार्वजनिक वाहतुकीस सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्ट असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक पंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. या भागांमध्ये वाहतुकीसाठी सूचना फलक उभारण्यात येणार असून आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पर्यटन हंगामादरम्यान वाहतुकीची सुरक्षा आणि पर्यटकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि असुविधा टाळण्यासाठी हा आदेश महत्त्वाचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT