Calangute MLA Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

MLA Michael Lobo: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण सर्वांना विश्वासात घ्यायला हवे होते...

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचे मत; गोव्यातील शांतता आणि एकोपा कायम राहिला पाहिजे

गोमंतक ऑनलाईन टीम

MLA Michael Lobo: कळंगुट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर येथील आमदार मायकल लोबो यांनी या घटनेबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणाचाच विरोध नाही, पण पुतळा बसवताना संबंधित सर्व घटकांना विश्वासात घ्यायला हवे होते, इतकी घाई करण्याचे काही कारण नव्हते, असे मत लोबो यांनी व्यक्त केले आहे.

आमदार लोबो म्हणाले की, त्या दिवशी पुतळा हटवत असल्याबाबतची चुकीची माहिती पसरवली गेली. त्यामुळे हे प्रकरण अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत चर्चिले गेले. काही गोंधळ करायची गरज नव्हती. जागेला कुणाचीही हरकत नाही.

लोबो म्हणाले, आम्ही रोनाल्डोचा पुतळा उभारला, पण तो रस्त्यात नाही. तो दोन रस्त्यातील ओपन स्पेसमध्ये आहे. त्यालाही कुणाची हरकत नव्हती. येथेही कुणाची हरकत नव्हती. पण या मुद्याचा मोठा इश्यु केला गेला.

गोव्यात सर्व गोवेकर एकत्र राहतात. गोवा शांत राज्य आहे. येथील शांतता आणि एकोपा कायम राहिला पाहिजे.

लोबो म्हणाले, पुतळा उभारताना सर्वांना विश्वासात घेतले गेले पाहिजे होते. पंचायत आहे, आमदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यापैकी कुणालाही विश्वासात घेतले गेले नाही. संबंधित समितीने विश्वासात घ्यायला हवे होते.

पुतळ्याला कुणाचाही विरोध नाही. आता तिथे दोन सर्कल झाले आहेत. आता, सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक विभागाला तिथे काम करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

Goa Assembly: कोळशाचा विषय पुन्‍हा पेटला, मुख्‍यमंत्री-सिक्‍वेरांच्‍या उत्तरातील तफावतीमुळे विरोधकांचा हंगामा! कामकाज 10 मिनिटं स्‍थगित

Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

Panaji News: धाकू मडकईकर यांची उत्तर गोवा जिल्हा परिषदअध्यक्षपदी निवड

SCROLL FOR NEXT