Calangute Dance Bar Dainik Gomantak
गोवा

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Group Congress Committee Calangute: गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते विवेक डिसिल्वा यांनी १५ जुलै २०२६ रोजी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्यांच्या आधारे कळंगुट ब्लॉक काँग्रेस कमिटीने कळंगुट पोलिसांना निवेदन सादर केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते विवेक डिसिल्वा यांनी १५ जुलै २०२६ रोजी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्यांच्या आधारे कळंगुट ब्लॉक काँग्रेस कमिटीने कळंगुट पोलिसांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे परिसरातील बेकायदेशीर स्पा, मसाज पार्लर, डान्स बार आणि उशिरापर्यंत चालणाऱ्या संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

कळंगुट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा, प्रवक्ते विवेक डिसिल्वा आणि ब्लॉक काँग्रेसच्या इतर सदस्यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन पोलिस प्रशासनाला सुपूर्द केले.

पंचायत नियम, अटींचे उल्लंघन करत कोणत्याही वैध परवानग्यांशिवाय मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर काँग्रेसने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी कडक तपासणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कळंगुट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा म्हणाले, कळंगुटमधील नागरिक आता या प्रकारांविरुद्ध ठोस कारवाईची मागणी करत आहेत. प्रशासनाने सातत्याने तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू राहणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

स्पा, मसाज पार्लर आणि डान्स बारची पडताळणी करणे, वेळेच्या नियमांची कडक अंमलबजावणी, तसेच दलाल, पर्यटकांची सतावणूक, अमलीपदार्थ, बेकायदेशीर प्रकारांवर अंकुश ठेवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

‘सात दिवसांत कारवाईचा अहवाल द्यावा’

पुढील सात दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशी मागणीही कमिटीने केली आहे. जर सात दिवसांत प्रभावी कारवाई झाली नाही, तर हा विषय वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि संबंधित सरकारी विभागांकडे नेला जाईल, असा इशाराही काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

‘कायमस्वरूपी कारवाई व्हावी’

विवेक डिसिल्वा म्हणाले, कळंगुटला बेकायदेशीर कृत्यांचे केंद्र बनू दिले जाणार नाही. तक्रार करणे, छापे टाकणे, आस्थापन बंद करणे आणि काही दिवसांत ते पुन्हा सुरू होणे, हे चक्र आता थांबले पाहिजे. आम्हाला प्रशासनाकडून कायमस्वरूपी कारवाई आणि उत्तरदायित्व हवे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT