Child Abuse Case Dainik Gomantak
गोवा

Child Abuse Case: कळंगुटमध्ये 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; 11 वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा

Goa POCSO Case: राज्यात मुलांवरील लैंगिक अत्याचारांचे सत्र सुरूच असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: राज्यात मुलांवरील लैंगिक अत्याचारांचे सत्र सुरूच असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कळंगुट येथे पाच वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या ११ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेल्या १५ दिवसांत राज्यात घडलेली ही चौथी घृणास्पद घटना आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेचे आई-वडील कळंगुट येथील एका रेस्टॉरंटमध्ये कामाला जातात. १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आई-वडील कामावर असताना त्यांच्या शेजारी राहणारा आणि मुलांसोबत खेळण्यासाठी नेहमी घरी येणारा ११ वर्षीय मुलगा घरात आला.

घरात कोणी नसल्याची संधी साधून या मुलाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आणि मारहाण केली. बालिकेने घाबरत आईला सर्व प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने कळंगुट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

यापूर्वी म्हापसा आणि काणकोण येथेही लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या आणि त्या दोन्ही प्रकरणांतील संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अवघ्या १५ दिवसांत राज्यात घडलेल्या या चौथ्या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अल्पवयीनावर गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ६५(२), गोवा बाल कायदा २००३ चे कलम ८ (२) आणि पोक्सो कायद्यातील कलम ४, ८ व १० अन्वये अल्पवयीन बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पीडित मुलगी आणि संबंधित मुलगा या दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि कळंगुटचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सानिशा नाईक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीवर SWP सुविधा, बेरोजगारीवर 2 महिन्यांचा नियम आणि 10 टक्के बॅलेन्स मर्यादा; ईपीएफओचे नवे नियम लागू

Kidney Transplant: गोव्यात प्रथमच 'स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट' यशस्वी; 2 जोडप्यांतील मूत्रपिंडांच्या अदलाबदलीतून रुग्णांना नवजीवनाची आशा

Imran Khan: 'इम्रान खान यांना तात्काळ सोडा', UN मानवाधिकार प्रमुखांची मोठी मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकड्यांची पुन्हा कोंडी

Abhijeet Dipke Goa Visit: नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे सीजेपीचे अभिजीत दीपके गोव्यात; तरुणाईशी साधणार संवाद

Noise Pollution: नरकासुर कलेला प्रोत्साहन, ध्वनिप्रदूषणाला लगाम; गोवा खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निर्देश

SCROLL FOR NEXT