Goa Drugs  Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: नायजेरियन नागरिकाला न्यायालयाचा दणका! ड्रग्जतस्करी प्रकरणात जामीन फेटाळला

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Drugs Case

पणजी: कळंगुट येथे छापा टाकून चार वर्षापूर्वी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत मायकल ओकेरो या नायजेरीयन नागरिकाला अटक केली होती. या संशयिताच्या विरोधात पुरेसा प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित ओकेरो याने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला.

याप्रकरणी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाचे तत्कालीन उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी पथकाच्या मदतीने परबवाडा - कळंगुट येथील ग्रीन फिंगर नर्सरीजवळ २ एप्रिल २०२१ रोजी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले होते. खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.

तिथे दुचाकी घेऊन आलेल्या संशयित मायकल ओकेरो या नायजेरीयन नागरिकांची पथकाने झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून २.८० लाख रुपये किमतीचे १४.४३ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि ९.५९ ग्रॅम हिरोईन जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास करून उपनिरीक्षक रोहन मडगावकरयांनी ३० सप्टेंबर २०२१ रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सादर केलेल्या पुराव्याची दखल घेत न्यायालयाने संशयित मायकल ओकेरो याच्याविरुद्ध नोव्हेंबर २०२१ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरु केला.

न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर संशयिताने सत्र न्यायालयात संशयित ओकेरो याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित ओकेरो यांनी व्यावसायिक पद्धतीचे ड्रग्ज तस्करी केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांची दखल घेऊन न्यायालयाने त्याच्या जामीन अर्ज फेटाळून लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT