Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: वाढदिवसाच्या पार्टीत 2 अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार; पर्वरीतील दोघांना 3 दिवसांची पोलिस कोठडी

Goa Crime News: बांबोळी येथील तीन अल्पवयीन मुलींना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून त्यातील दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Sameer Amunekar

पणजी: बांबोळी येथील तीन अल्पवयीन मुलींना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून त्यातील दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी पर्वरीतील संशयित अल्ताफ मेहबूब मुजावर (१९) व ओम विनय नाईक (२१) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने ३ दिवसांची कोठडी दिली आहे.

बांबोळी कॉम्प्लेक्स येथे राहत असलेल्या दोन कुटुंबातील ११ ते १५ वयोगटातील तीन अल्पवयीन मुली ८ जून रोजी गायब झाल्या होत्या. रात्री उशिरा न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. आगशी पोलिसांनी कळंगुट येथील एका हॉटेलमधून तिन्ही अल्पवयीन पीडित मुलींची सुटका केली.

तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन तरुणांनाही ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले. हॉटेलमध्ये चौकशी करता असे दिसून आले की दोन्ही संशयितांनी हॉटेलमध्‍ये दोन वेगवेगळ्या खोल्‍या आरक्षित केल्‍या होत्‍या. संशयितांपैकी एकाचा वाढदिवस होता व या पीडित मुलींना त्यासाठी बोलावण्यात आले होते.

या तिन्ही मुलींना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बांबोळी येथील पीडित सहाय्यता केंद्रात पाठवण्यात आले. त्‍यांच्‍या जबाबातून असे दिसून आले की, हॉटेल रूममध्ये दोन पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. त्यानुसार पोलिसांनी गोवा बाल कायदा २००५ च्या कलम कलम ८ (२), बीएनएसच्या कलम १३७ (२), ६४(१), ७४, ७५(१) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पुढील तपास निरीक्षक अनंत गावकर यांच्या देखरेखीखाली महिला पोलिस उपनिरीक्षक दीपिका परवार आणि उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT