Goa Beach | Beggars  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर कळंगुट किनाऱ्यावरील भिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Goa Beach: कळंगुट- बागा किनारी उपद्रव करणाऱ्या भिकाऱ्यांना न्यायालयात हजर करुन त्यांना समज देऊन सुटका केली.

दैनिक गोमन्तक

Goa Calangute Beach: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर बार्देशातील कळंगुट तसेच बागा येथील समुद्र किनारी लाखोंच्या संख्येने देशी- विदेशी पर्यटक उतरलेले असून त्यांना उपद्रव करणाऱ्या भिकाऱ्यांना कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयात हजर करून त्यांना समज देऊन सुटका केली, अशी माहिती निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी दिली.

कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणातील भिकारी मोठ्या प्रमाणात कळंगुट -बागा परिसरात उपद्रव करीत आहेत. येथील किनारी भाग तसेच मार्केट परिसरात भीक मागण्यांच्या हेतूने फिरतात. त्यामुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे.

यासंबंधात स्थानिक शॅकवाले तसेच दुकानदारांनी पोलिसात कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी महिला उपनिरीक्षक तसेच अन्य शिपायांच्या मदतीने कारवाई केली. यावेळी भीक मागणारे सहा पुरुष, सहा महिला आणि अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून त्यांना योग्य समज आणि इशारा देऊन सोडून देण्यात आले.

कळंगुट पाठोपाठ हणजुण -वागातोरातही मोठ्या प्रमाणात भीक मागणाऱ्या लोकांचे गट फिरत असल्याचे आढळल्याने हणजुण पोलिसांकडून तात्काळ त्यांना हुसकावून लावण्यासाठी कालपासूनच विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT