G20 Summit In Goa Dainik Gomantak
गोवा

G20 Summit In Goa : ‘एसएआय20’ बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘कॅग’चे प्रतिनिधी मंडळ गोव्यात दाखल

हॉटेल, विमानतळाला देणार भेट

दैनिक गोमन्तक डिजिटल

जून महिन्यात नियोजित सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स (एसएआय२०)च्या शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक (कॅग) कार्यालयाचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ संचालक (कार्मिक) विशाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या दौऱ्यावर आले आहे.

यावर्षी भारत देशास जी-20चे अध्यक्षपद लाभले असल्याने एसएआय20 या संस्थेचे अध्यक्षपद भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक हे भूषवित आहेत. भारतासह 20 सदस्य देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्रात सुशासन आणि सार्वजनिक जबाबदारी याबाबींचा प्रसार करणे व त्यांना चालना देण्यासाठी भारतास संधी मिळाली आहे.

सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन (किंवा एसएआय 20 किंवा साई20) हा जी-20 सदस्य देशांमध्ये सुशासन, प्रादर्शकता व जबाबदारपणा या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी लेखापरिक्षण करणाऱ्या संस्थांचा समूह आहे. जी-20 परिषदेचा एक भाग म्हणून गोव्यात 12 ते 14 जून दरम्यान ‘एसएआय२०’च्या दोन बैठकांचे नियोजन करण्यात येणार आहे.

सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा, संवाद घडवून प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शकता तसेच जबाबदारी वाढवण्याबाबत धोरण निर्मिती करण्याचे प्रयत्न एसएआय २०च्या संपर्क गटाने राबवले आहेत. या धोरण शिफारशींचा वापर संबंधित देशाचे धोरण हे शिखर संस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत करणे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभावी ठरतील यासाठी केला जातो.

हॉटेल, विमानतळाला देणार भेट

गोवा सचिवालयामध्ये या शिष्टमंडळासमवेतची बैठक गोव्याचे शिष्टाचार सचिव आणि जी-२० परिषदेसाठीचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हे शिष्टमंडळ शनिवारपर्यंत गोवा दौऱ्यावर असून एसएआय२० शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विविध हॉटेल, विमानतळ आणि परिषद ठिकाणांना भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक तसेच एसएआय २०चे अध्यक्ष गिरीश चंद्र मुर्मू यांनी आगामी एसएआय बैठकांमध्ये सागरी जल अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांचाही समावेश करण्यास सूचित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT