Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: मडगाव रेल्वे स्थानक ते कदंब स्थानक बसेस लवकरच सुरू

रेल्वे स्थानकावरून कदंब बससेवा सुरू करण्यासाठी कदंब परिवहन मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथील कोकण रेल्वे स्टेशनसमोरील पार्किंग प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. मल्टीलेवल पार्किंग इमारतीचे काम ही अंतिम टप्प्यात आहे. तसेच रेल्वे स्थानकावरून कदंब बससेवा सुरू करण्यासाठी कदंब परिवहन मंडळाने हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी माहिती दिली.

मडगाव येथील स्टेशनसमोर करण्यात येत असलेल्या पार्किंग प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 25 कोटी रुपयांचा निधी पुरविला आहे. यातील 13 कोटी रुपये मडगाव स्टेशनच्या पार्किंग विस्तारासाठी वापरण्यात आले आहेत. उर्वरित निधी थिवी आणि करमळी स्टेशनसाठी वापरण्यात आला आहे. मडगाव येथील स्टेशनसमोर बस थांबा, पार्किंग शेड अशी कामे पूर्ण झाली आहेत. केवळ मल्टीलेवल पार्किंग प्रकल्पाच्या कामावर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे.

अशाने येथील सर्व प्रकल्पाची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती घाटगे यांनी दिली. मडगाव येथील कदंब बस स्थानकापासून कोकण रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशांना ये-जा करण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरु असून याला कदंब परिवहन मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे आणि येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT