Fatorda Bus accident Dainik Gomantak
गोवा

फातोर्डातील अपघातप्रकरणी बस चालक दोषी, न्यायालयाने ठोठावली शिक्षा

दंडाची रक्कम न भरल्यास दीड महिना कैदेची शिक्षा भोगावी लागणार

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत असलेल्या काकोड - कुडचडे येथील मिनी बसचालक आंतोनियो रोबेलो (वय 48) याला न्यायालयाने (court) दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. या अपघाताची घटना 20 ऑक्टोबर 2019 रोजी दिकरपाली मडगाव येथे घडली होती. आरोपपत्रानुसार दोषी ठरलेला चालक बस चालवत होता. या दरम्यान बसचालकाने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येत असलेल्या एका दुचाकीला धडक (accident) दिली होती. यावेळी दुचाकीवर असलेले दोघेजण जखमी झाले होते.

यासंबंधी मायणा कुडतरी पोलिसांनी वरील आरोपीविरुद्ध मडगावच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. मडगावच्या (Margao) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा पारकर यांच्या न्यायालयाने आरोपीला भा. द. सं. 279, 337 कलमाखाली दोषी ठरवून दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास दीड महिना कैदेची शिक्षा भोगावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT