Sanquelim Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Accident: 'काळ आला होता पण...', पदपथावरून उतरलेल्या बसने दोन कारना नेले फरपटत

Goa Accident: बस नियंत्रण सुटलेल्या अवस्थेत बसस्थानकापर्यंत खाली उतरली असती तर मोठा अपघात घडला असता

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: साखळी बसस्थानकाजवळील टपाल कार्यालयासमोरील उतरणीच्या पदपथावर उभी करून ठेवलेली बस अचानक खाली उतरल्याने दोन कारगाड्यांना धडकली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. दुसऱ्या कारमुळे बस अडकून पडली, अन्यथा ती बसस्थानकापर्यंत गेली असती व मोठा अपघातही घडला असता.

ही घटना आज सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. या उतरणीच्या पदपथावर जीए - ०४ - टी - १३९७ क्रमांकाची बस उभी करून ठेवली होती. ती अचानक खाली उतरली. सर्वप्रथम या बसने एमएच - ४३ - बीई - ५८९७ या या कारला धडक दिली. या धडकेत ही कार फरफटत बाजूला गेली. त्यानंतर बसने समोर असलेल्या दुसऱ्या कारला धडक दिली. ही कार आडवी होत बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीला अडकली व बस या कारवरच स्थिरावली.

बसच्या धडकेत दुसरी कार जर बाजूला सरकली असती, तर बस थेट रस्त्यावर आली असती व बसस्थानकापर्यंत गेली असती. साखळी बसस्थानकाचा रस्ता व परिसर हा सदैव रहदारीचा असतो. त्यातच सकाळच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये - जा चालू असते.

पदपथावर पार्किंग नको

ही बस नियंत्रण सुटलेल्या अवस्थेत बसस्थानकापर्यंत खाली उतरली असती, तर मोठा अपघात घडला असता. सुदैवाने संभाव्य अनर्थ टळला. साखळी नगरपालिकेने पादचारी व विद्यार्थ्यांना चालण्यासाठी पदपथ बनविला आहे. त्यावर वाहने पार्किंग करायला देऊ नये, अशी स्थानिकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT