Cuchelim Bus Fire News
म्हापसा: कुचेली येथे साईबाबा मंदिराजवळ गवताला लावलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी प्रवासी बस पडली. यात बसमालकाचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दुर्घटनाग्रस्त जीए ०१ यू ५२१० क्रमांकाची अंबा ट्रॅव्हल्स ही बस म्हापसा-पणजी मार्गावर सेवा देत असे.
बस मालक नितीन मांद्रेकर ( पर्वरी) यांनी या बसचे कोलवाळ येथील एका गॅरेजमध्ये नूतनीकरणाचे काम केले होते. नविन कुशल शीट कव्हर आणि इतर लहानसहान डागडुजीच्या कामाचा त्यात समावेश होता.
गॅरेजमधून काढून ही बस साईबाबा मंदिराच्या समोरील पठारावर पार्क केली होती. या पठारावरील सुकलेल्या गवताला लागलेली आग बसपर्यंत पोचली आणि काहीक्षणात बसने पेट घेतला.
प्रसंगावधाने इतरांनी या ठिकाणीच पार्क केलेली अन्य वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र बसचा चालक घटनास्थळी नसल्याने ती आगीच्या झळापासून सुरक्षितस्थळी हलविणे शक्य झाले नाही.
काहीवेळात आगीने संपूर्ण बसला वेडा घातला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत संपूर्ण बस आगीत खाक झाली होती.
म्हापसा अग्निशमन दलाचे हवालदार रणजित गावकर, जयेश कांदोळकर, अशोक वळवईकर, अक्षय सावंत व भगवान पाळणी या जवानांनीआगीवर नियंत्रण मिळवले. म्हापसा पोलिस हवालदार सुदेश नाईक यांनी पंचनामा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.