Tisca Ponda Fire Incident
फोंडा: तिस्क-फोंडा येथील कॉमर्स ट्रेड सेंटर इमारतीतील ग्लोबल व्हिजन या चष्म्याच्या दुकानाला आज (शनिवारी) सकाळी १० वा.च्या सुमारास अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीचे कारण निश्चित समजू शकले नसले तरी विजेच्या उच्च दाबामुळे ही आग लागली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्याचे दिसताच त्वरित फोंडा अग्निशामक दलाला कळविल्यानंतर जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. विशेष म्हणजे ही आग रात्रीच्यावेळी लागली असती तर मोठे नुकसान झाले असते. या दुकानाच्या बाजूला कपड्याचे तसेच इतर साहित्याची दुकाने असल्याने आगीचा फटका इतरांनाही बसला असता, सुदैवाने आग आटोक्यात आल्याने अनुचित प्रसंग टळला; पण ग्लोबल व्हिजन या दुकानाचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.