Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Bus Accident: कमानपाटा तुटून बस उलटली शेतात

भिंडे-बेतोडा येथे काल झालेल्या अपघातात प्रवासी बसचा कमानपाटा तुटल्याने ती रस्त्यावरून घसरून लगतच्या शेतात उलटली.

दैनिक गोमन्तक

Bus Accident: भिंडे-बेतोडा येथे काल झालेल्या अपघातात प्रवासी बसचा कमानपाटा तुटल्याने ती रस्त्यावरून घसरून लगतच्या शेतात उलटली. या दुर्घटनेत 30 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये बसचालकासह 14 विद्यार्थी, काही वयोवृद्ध लोक आणि प्रवाशांचा समावेश होता.

यापैकी 19 प्रवाशांना उपचारानंतर डिस्चार्ज दिला. पाचजण आयडी इस्पितळात, तर तिघे गोमेकॉत उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7-30 च्या सुमारास निरंकाल-बेतोडा रस्त्यावर भिंडे येथे पंचायत कार्यालयाजवळ वेलांकनी नावाची खासगी प्रवासी बस सुमारे 30 प्रवासी, 1वाहक आणि चालकासह फोंड्याच्या दिशेने निघाली होती.

भिंडे येथील साकव ओलांडताना बसच्या पुढील चाकावरील कमानपाटा तुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला शेतात कोसळली. मोठा आवाज झाल्यामुळे त्वरित लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्थानिक आमदार तथा जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

तसेच फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये जखमी प्रवाशांची विचारपूस केली. शक्य त्यांना यावेळी मदतही करण्यात आली.

ज्या ठिकाणी अपघात घडला, तेथे रस्ता अरुंद आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारावी, अशी स्थानिकांची मागणी असून ती लवकरच उभारण्यात येईल. काळजीपूर्वक वाहन चालवण्याची आवश्यकता आहे. या अपघाताची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT