Bus Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

शिरसईत प्रवासी बसची वीज खांबाला धडक

अनेक प्रवासी जखमी; शर्थीच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश

दैनिक गोमन्तक

पणजी : शिरसई थिवी येथे प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्याशेजारील विजेच्या खांबाला धडक बसल्याने बसचं मोठं नुकसान झालं. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर अडकलेल्या बस चालकाला लोकांनी सुरक्षित बाहेर काढले.

उत्तर गोव्यातील शिरसई येथे शनिवारी दुपारी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याशेजारील विजेच्या खांबाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातावेळी बसमध्ये अनेक प्रवासी असल्याने ते जखमी झाले आहेत. चालकाच्या बाजूने बस खांबाला धडकल्याने गाडीचा चालक अकडून बसला होता. स्थानिकांच्या मदतीने चालकाला बसच्या बाहेर काढण्यात आलं आहे.

दरम्यान गोव्यात गुरुवारी रात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातलं. त्यातच भर म्हणजे पर्वरी परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. कंटेनरने आपल्यासह इतर दोन वाहनांचंही मोठं नुकसान केलं. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचे मात्र तीनतेरा वाजले. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने जाहिरातीसाठी लावलेल्या एका गाडीचाही चेंदामेंदा झाला आहे. यामुळे गुरुवारी रात्रीपासून सुकूर जंक्शनपासून ते पर्वरीपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT