OX Fighting
OX Fighting 
गोवा

राज्यात बैलांच्‍या ‘झुंजीं’ना वेसण!

UNI

पणजी - राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या बैलांच्या झुंजी आयोजकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी एक खास पथके स्थापन करावीत आणि कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दिले. राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, प्राणी कल्याण मंडळाच्या बैठकीत बिगर सरकारी संस्था प्राणी कल्याणाच्या क्षेत्रात वावरणारे कार्यकर्ते यांनी बऱ्याच सूचना केल्या. सरकार त्यांच्या सूचनांचे स्वागत करतो. बैलांच्या झुंजी बेकायदेशीरपणे राज्यात आयोजित केल्या जातात. पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. यापुढे अशा बैलांच्या झुंजी आयोजित केल्या जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी खास पथके स्थापन करून कारवाई करावी, असे आदेश मी दिले आहेत. कत्तलीसाठी जनावरांची बेकायदेशीरपणे केली जाणारी वाहतूक हा एक चिंतेचा विषय आहे. त्या विरोधात कारवाई केली जात आहे.

प्राणी कल्याणासाठी भटकी जनावरे पोषणासाठी ही योजना आहे. त्या योजनेचा निधी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन खात्याकडून संबंधित पंचायत, पालिका यांना देण्यात येत होता त्यानंतर तो संस्थांना वितरीत केला जात होता. आता ही पद्धत बदलून पशुसंवर्धन पशुवैद्यकिय खात्याकडून हा निधी थेटपणे बिगर सरकारी संस्थांना भटक्या गुरांच्या देखभालीसाठी दिला जाणार आहे. या सुटसुटीतपणामुळे भटक्या गुरांची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT