Bulbul International Film Festival Dainik Gomantak
गोवा

‘बुलबुल’ चित्रपट महोत्सवासाठी मडगाव सज्ज! रवींद्र भवन सजले प्राण्यांच्या कलाकृतीने; दिग्दर्शक नागराज मंजुळेंची खास उपस्थिती

Bulbul International Film Festival: मडगाव येथील रवींद्र भवनात तिसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवार १३ जानेवारीपासून सुरवात होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव येथील रवींद्र भवनात तिसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवार १३ जानेवारीपासून सुरवात होत आहे. या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मुले, पालक व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजक सज्ज झाले आहेत. यंदा महोत्सवाची प्राणी ही संकल्पना असल्याने रवींद्र भवन वेगवेगळ्या प्राण्यांच्या कलाकृतीने सजविण्यात आले आहे.

गेले तीन दिवस अंतरंग प्रॉडक्शनतर्फे रवींद्र भवनातील तयारीवर लक्ष ठेवून आहेत. रवींद्र भवनात मुलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी दालने उभी केली असून परिसराला एक आगळे वेगळे रुप प्राप्त झाले आहे.

माहिती व प्रसिद्धी खात्याचे या महोत्सवाला आर्थिक सहकार्य लाभले असून शिक्षण खात्याकडून शालेय विद्यार्थ्यांना महोत्सवाला खास भेट देण्यासाठी आवाहन केले जात आहे.

राज्यातील ११० पेक्षा जास्त शाळांनी या महोत्सवासाठी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी ३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक बिपिन खेडेकर यांनी या प्रतिनिधीला दिली.

संध्याकाळी ५ वाजता भव्य उद्घाटन सोहळा होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, माहिती व प्रसिद्धी तसेच शिक्षण खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय मराठी व बॉलिवूडमधील प्रसिद्ध व ख्यातनाम व्यक्तीच्या उपस्थितीमुळे या महोत्सवाला उच्च श्रेणीचा दर्जा प्राप्त होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची खास उपस्थिती असणार आहे, असे खेडेकर यांनी सांगितले. उद्‍घाटन सोहळ्यात कोलकाता येथील नृत्य अकादमीतर्फे तसेच स्थानिक कलाकारांकडून नृत्य सादरीकरण होणार आहे.

‘एप्रिल-मे ९९’ मराठी चित्रपटाने सुरवात

‘उद्‍घाटन सोहळ्यानंतर रोहन मापुसकर यांचा एप्रिल-मे ९९ हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. पूर्वी एप्रिल- मे महिन्यात मुले सुटी कशी घालवायचे, कोण कोणती मौज मजा करायचे याचे चित्रण कोकणातील निसर्गरम्य अशा वातावरणात केले आहे. त्याच बरोबर वेशभूषा, समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत.

१४ जानेवारी रोजी रक्षित टंडन यांचे सायबर गुन्ह्यापासून संरक्षण व दिलीप बेतकीकर यांचे उत्तमरीत्या पालकत्व कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन हे महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नियुक्त केलेले ज्युरी बेल्जियम, जर्मनी, कॅनडा, नेपाळ येथून आज गोव्यात पोहोचल्याची माहिती खेडेकर यांनी दिली.

या व्यतिरिक्त रवींद्र भवनच्या परिसरात खाद्य पदार्थ व इतर अनेक प्रकारचे स्टॉल्स उघडण्यात येणार आहे. पूर्वी लोक ज्या पारंपरिक वस्तू वापरायचे त्यांचे प्रदर्शन करणारे खास दालन उघडण्यात येणार आहे अशी माहिती खेडेकर यांनी दिली.

हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट महोत्सव नसून जीवनातील समस्या परिणामकारकरीत्या कशा हाताळता येतील यांचे मार्गदर्शन करणारा हा महोत्सव व्हावा, त्यादृष्टिने पूर्ण मांडणी करण्यात आल्याचे खेडेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Banned: क्रीडाविश्वात खळबळ! 'या' क्रिकेटपटूवर कायमची बंदी, लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर बोर्डाची कारवाई

Arambol Spa Massage Parlors: हरमलातील स्पा व मसाज पार्लर बंद करण्याचा ठराव, सभेत ग्रामस्थांनी व्यक्त केल्या संतप्त भावना

Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्‍यासक्रम बदलणार, पहिली ते दहावी या सर्वच इयत्तांसाठी 'NEP'ची अंमलबजावणी

'करो या मरो' महाआंदोलनाची हाक, पणजीत '39-ए' विरोधात लढा; विरोधकांकडून जनतेला सहभागाचे आवाहन

Horoscope: राशीचक्रात उलथापालथ! अंगारक योग 'या' भाग्यवान राशींना करणार मालामाल, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT