Crime News Dainik Gomantak
गोवा

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Buimpal Kidnapping Case: भुईपाल येथे रविवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने १२ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: भुईपाल येथे रविवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने १२ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मुलगा आपल्या घराजवळच राहात असलेल्या आतेभावाला घरी सोडून परत येत होता. यावेळी अचानक एक ओमनी कार तेथे थांबली आणि कारमधील एका व्यक्तीने त्याला जबरदस्तीने वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मुलाने वेळ न दवडता त्या व्यक्तीच्या हाताचा चावा घेतला आणि जोरात ओरडू लागला. मुलाच्या आरडाओरड्यामुळे अपहरणकर्त्याने घाबरून तेथून पळ काढला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, गाडीत दोन व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर मुलाच्या आई-वडिलांनी वाळपई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. मुलाच्या हातावर अपहरणकर्त्याच्या नखांच्या जखमा झाल्या असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही घटना भरवस्तीत घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT