Boat Dainik Gomantak
गोवा

Goa: बोट, ट्रॉलर्सवर शौचालये बांधण्यासाठी पाच ते सहा महिन्‍यांची मुदतवाढ; मत्‍स्‍योद्योगमंत्री

Goa Fishing: बोटमालकांनी कामगारांसाठी हेल्थ कार्ड सक्तीचे करावे असे आदेश खात्‍यातर्फे देण्‍यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मासेमारी उद्योगात काम करणाऱ्यांसाठी स्वच्छता अनिवार्य आहे. त्‍यासाठी खाते प्रयत्नशील आहे. प्रत्येक मच्छीमाराने आपल्या बोटीवर, ट्रॉलर्सवर शौचालय बांधणे काळाची गरज बनली असून, ते आवश्‍‍यकच आहे. मात्र सध्‍या मच्‍छीमारांच्या समस्या लक्षात घेऊन त्‍यांना त्यांच्या बोटींवर शौचालये बांधण्यासाठी पाच ते सहा महिन्‍यांची मुदतवाढ देण्‍यात आली आहे, असे मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

कुटबण जेटीवरील कॉलरा आणि डायरियाची साथ आता नियंत्रणात आलेली आहे. गेल्‍या २४ तासांत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. यापूर्वी या प्रकरणांशी संबंधित पाच रुग्णांचे मृत्यू झाले होते.

बोटमालकांनी कामगारांसाठी हेल्थ कार्ड सक्तीचे करावे असे आदेश खात्‍यातर्फे देण्‍यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागांना नियमित आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे हळर्णकर म्‍हणाले.

पूर्वीच्या बोटींना शौचालयाची सक्ती नकोच : हर्षद धोंड

मांडवी फिशरमन को-ऑपरटिव्ह मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जुन्या बोटींना शौचालय सक्तीचे करू नये अशी मागणी मत्‍स्‍योद्योग खात्‍याकडे केल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, ज्या बोटी किंवा ट्रॉलर्स २० मीटर बांधलेले आहेत, त्यात शौचालय बांधणे शक्य नाही. आता भविष्यात जेव्हा बोट बांधली जाईल, त्‍यांना शौचालय सक्तीचे करावे. तसेही २०१७ नंतर बांधलेल्या प्रत्येक बोटीत शौचालय आहेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

VIDEO: 38 व्या वर्षी क्रिकेटपटूचं निधन; ढसाढसा रडला राशिद खान; अंत्ययात्रेतील व्हिडिओ भावुक करणारा

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

Goa Digital Library: राज्यात केवळ 2.9 टक्‍के शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी; 33 टक्‍के शाळांमध्येच 'स्मार्ट क्लासरूम', केंद्र सरकारचा अहवाल

SCROLL FOR NEXT