Builder Venkatesh Moni Arrested Dainik Gomantak
गोवा

Builder Arrested: सरकारचे 9 कोटी थकवले; पणजी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश मोनीला अटक

Goa Builder Arrested: दुकाने आणि कार्यालयांसाठी जागा घेतलेल्या ४२ जणांना व्याजासह ९ कोटींची भरपाई देण्याचे निर्देश ‘रेरा’ने प्रभू मोनी याला दिले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Builder Arrested

पणजी: गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटीने (रेरा) दिलेल्या निर्देशांचे पालन वारंवार नोटिसा बजावूनही न केल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश नारायण प्रभू मोनी याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

त्यानुसार शुक्रवारी ( 3 जानेवारी) पणजी पोलिसांनी (Panaji Police) त्याला पर्वरी येथून अटक केली. दुकाने आणि कार्यालयांसाठी जागा घेतलेल्या ४२ जणांना व्याजासह ९ कोटींची भरपाई देण्याचे निर्देश ‘रेरा’ने प्रभू मोनी याला दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न करता गेल्या दोन वर्षांपासून तो चालढकलपणा करत होता.

तारीकडे-म्हापसा येथे बांधकाम व्यावसायिक प्रभू मोनी याच्याकडे ४२ जणांनी दुकाने तसेच कार्यालयासाठी गाळे खरेदीचा करार केला होता. मात्र, बांधकाम पूर्ण करण्यात ते अयशस्वी ठरले होते. आवश्‍यक सुविधा उपलब्ध न करताच ताबा स्वीकारण्यास त्याने सांगितले असता तो घेण्यात आला नव्हता. त्या इमारतीत संरचनात्मक दोष असल्याचा दावा दुकाने व कार्यालये खरेदी केलेल्यांना केला होता.

त्याने बोगस दस्तावेज दाखल करून म्हापसा पालिकेकडून मिळवलेले भोगवटा प्रमाणपत्रही त्यानंतर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे गाळेधारकांनी ‘रेरा’कडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन ‘रेरा’ने १७ मार्च २०२२ व ३० नोव्हेंबर २०२२ रोजी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध दोन वेगवेगळे आदेश जारी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT